कधी काळी संजय दत्त यांच्या पत्नी सोबत लिव-इन मध्ये राहत होते लिएंडर पेस, आता चर्चेत आहे या अभिनेत्रींमुळे !

मनोरंजन विश्वाचे क्रीडा विश्वा सोबत नेहमीच एक वेगळे नाते दिसून आले आहे. बॉलीवूड च्या अनेक अभिनेत्री क्रीडापटूं सोबत विवाहाबद्द झाल्या. तर काहींचे लग्न झाले नसले तरीही त्यांच्या अफेअरच्या चर्चा मात्र खूप रंगल्या. सध्या बॉलीवूड अभिनेत्री किम शर्मा ही प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेसला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांना गोव्यामध्ये पाहिले गेले. त्या दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

रिया पिल्लाई सोबत सुद्धा लिएंडर पेसचे नातं होतं मात्र त्यांनी कधीच हे नाते अधिकृत रित्या जाहीर केले नाही. मात्र त्यांच्या फोटो वरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे दिसून येत होते. किम शर्मा च्या आधी लिएंडर हा महिमा चौधरी आणि संजय दत्तची पत्नी मॉडेल रिया पिल्लई सोबत रिलेशन मध्ये होता. लिएंडर आणि रियाने दहा वर्षे एकमेकांना डेट केले. एवढेच नव्हे तर ते दोघं लीव्ह इन मध्ये राहत असल्याच्या सुद्धा चर्चा होत्या. मात्र त्यांचे नाते वाईट प्रकारे तुटले.

लिएंडर पेसच्या मनात बॉलीवूड अभिनेत्रींसाठी विशेष स्थान असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. रिया त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी तो अभिनेत्री महिमा चौधरी ला डेट करीत होता. ते दोघे तब्बल सहा वर्षे रिलेशन मध्ये होते. मात्र रियामुळे लिएंडर ने महिमा ला सोडल्याचे बोलले जाते. किंबहुना स्वतः महिमा ने सुद्धा तिच्या व लिएंडर च्या नात्यात रियामुळे दुरावा आल्याचं कबूल केले होते.

२००३ मध्ये लिएंडर पेस आणि आर्ट ऑफ लिविंग ची ट्रेनर रिया पिल्लई सोबत ओळख झाली होती. मात्र तेव्हा रियाचे संजय दत्त सोबत आधीच लग्न झाले होते. रिया व संजय चे लग्न १९९८ मध्ये झालेले. असे म्हणतात की विवाहित असून देखील रिया आणि लिएंडर मध्ये जवळीक निर्माण झाली होती. शिवाय संजय दत्त चे नाव सुद्धा बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींसोबत जोडले जात होते. त्यानंतर या दोघांचे नाते संपून दोघांनी २००८ मध्ये घ*ट*स्फो*ट घेतला.

रिया चे म्हणणे होते की, २००५ मध्ये तिचे व पेसचे लग्न झाले होते त्यांना आएना हे एक मुलगी सुद्धा आहे. रियाने सांगितले की, २००७ मध्ये लिएंडर केवळ २० दिवसांसाठी राहायचा. ४० दिवस तो त्याचा खेळ आणि इतर कामांमध्ये व्यस्त राहायचा. तर उरलेले १० महिने तो घराबाहेरच राहायचा पण तो कुठे असायचा हे तिला माहीत नव्हते. मात्र या सर्व गोष्टी तसेच रियासोबत लग्न झाले असल्याचे लिएंडर ने कधीच मान्य केले नाही. पण रिया आणि त्याच्या मुली सोबत अनेक ठिकाणी एकत्र दिसून यायचा.

पण त्यांचे नाते हळूहळू बिघडू लागले. रियाने लिएंडर आणि त्याच्या वडिलांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावला. पण पेसचे म्हणणे होते की त्याने कधीच रियासोबत लग्न केले नाही. रिया चे म्हणणे आहे की तिच्या मुलीला ब्रेन ट्यूमर चा आजार आहे. २००९ मध्ये तिने एकट्याने घर आणि तिच्या मुलीला सांभाळले त्यावेळी तिची आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप बिकट झाली होती.

त्यानंतर पेसने रियाला दिड लाख रुपये मेन्टेनन्स देणे सुरू केले व मुलीची कस्टडी मागितली. त्याचे म्हणणे होते की रियाने त्याला तिच्या प्रेग्नेंसी ची बातमी सुद्धा दिली नव्हती. मात्र तोपर्यंत त्यांचे नाते संपुष्टात आले होते.