करोडोचा मालक असलेला अभिनेता विजय आहे रोल्स रॉयस, मिनी कूपरसह बरीच लक्झरी वाहनांचा मालक, जाणून घ्या !

बॉलिवुडमधील कलाकार जसे सुपरहिट आहेत त्याचप्रमाणे साऊथकडील कलाकार सुद्धा सुपरहिट आहेत. त्यांचा देखील चाहता वर्ग जगभर पसरलेला आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे विजय. त्याने दक्षिणेकडे आता पर्यंत मास्टर, सरकार, थुपक्की, जिला, बीस्ट सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनया व्यतिरिक्त प्रेक्षकांना त्यांचा स्वभाव सुद्धा खुप भावतो. २०१२ मध्ये विजयने एक लग्झरी कार लंडनहुन मागवली होती. मात्र त्या कारचा टॅक्स त्याने न भरल्यामुळे काही दिवसांपुर्वीच मद्रास हाईकोर्टाने त्याला १ लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली.

सामान्य व्यक्ती असो वा कोणी सेलिब्रेटी प्रत्येकाला कोणत्याना कोणत्या गोष्टींचे कलेक्शन करण्याचा छंद हा असतो. काहींना घड्याळे तर काहींना वेगवेगळ्य़ा फॅशनचे कपडे जमवण्याचा छंद असतो. सुपरस्टार विजयला सुद्धा महागड्या गाड्या गोळा करण्य़ाचा शॉक आहे. त्याच्याकडे खुपसाऱ्या वेगवेगळ्या लग्झरी गाड्या आहेत. त्याच्या एका एका गाडीची किंमत लाखो-करोडोच्या घरात आहे. तो वेगवेगळ्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या गाड्यांनी जात असतो.

विजय हा साऊथकडील सगळ्यात महागडा सुपरस्टार आहे असे म्हटले जाते. बीएमडब्ल्यु गाड्यांवर असलेले त्याचे प्रेम जगजाहीर आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू एक्स5 सीरीज सेकंड जनरेशनचे कलेक्शन आहे. बीएमडब्ल्यू फाइव सीरीजची किंमत 75 ते 90  लाख रुपये इतकी आहे. रॉल्स रॉयससारख्या शाही गाड्या संपुर्ण बॉलिवुड आणि टॉलिवुडमध्ये काही कलाकारांकडेच आहे. त्यातीलच एक विजयसुद्धा आहे. विजयकडे ६ करोड रुपयांची ‘रोल्स रॉयस घोस्ट’आहे. विजय व्यतिरिक्त ही गाडी प्रियंका चोपड़ा आणि ऋतिक रोशनकडे सुद्धा आहे.

बीएमडब्ल्यू गाड़ीचे सर्वाधिक कलेक्शन विजय कडे जास्त आहे. त्या कार कलेक्शन मध्ये मिनी कुपर ही सर्वात स्वस्त कार आहे. जिची किंमत ३५ लाख रुपये आहे. बॉलिवुड आणि टॉलिवुड कलाकारांकडे सर्वाधिक पहायला मिळणारी कार म्हणजे ऑडी. विजयकडे सुद्धा बीएमडब्ल्यू आणि रोल्स रॉयसव्यतिरिक्त ऑडी A8 सारखी लग्जरी कारव आहे. या कारची स्टारटींग किंमत ५० ते ७० लाखांपर्यत आहे पण विजयकडे असलेल्या कारची किंमत दिढ करोड रुपये आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !