५१०० करोडचे मालक आहेत शाहरुख, चला जाणून घेऊया गौरी कि शाहरुख कोण जास्त करतात कमाई?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय सर्वांच्या परिचयाचे आहेत. हल्ली किंग खान आणि त्याचे कुटुंब चर्चेचा विषय ठरले आहेत. त्याचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणामध्ये त्याचे नाव आहे. ड्रग्ज प्रकरणात त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात होता. किंग खान व त्याच्या कुटुंबाला चाहते तसेच बॉलिवूडमधील मित्र परिवाराकडून आधार दिला जात आहे.

शाहरुख खान आणि गौरी खान बॉलिवूडमधील काही आदर्श जोडप्यांपैकी एक जोडपं आहे. शाहरुख खानची पत्नी चित्रपट निर्माती व इंटेरियर डिझायनर गौरी खान हीचा ८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असतो. गौरी खानचा जन्म ८ ऑक्टोबर १९७० रोजी झाला, उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींच्या घरांची आणि कार्यालयांची रचना केली आहे. त्यांनी लेडी श्री राम कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून इतिहासात पदवी प्राप्त केली. यानंतर गौरीने शाहरुख खानशी लग्न केले. २५ ऑक्टोबर १९९१ रोजी दोघांचे लग्न झाले. गौरी आणि शाहरुखची प्रेमकथा खूपच रोमांचक आहे.

शाहरुख खान पहिल्याच भेटीत गौरीच्या प्रेमात पडला होता. यानंतर दोघे जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि मग शेवटी लग्न केले.दोघांची पहिली भेट एका पार्टीमध्ये झाली होती. त्यावेळी शाहरुख खान १९ वर्षांचा होता आणि गौरी फक्त १४ वर्षांची होती. शाहरुखला पहिल्या नजरेत ;गौरी आवडली होती. त्याला तिच्यासोबत बोलायचे होते, पण गौरीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला होता.

सध्या ही जोडी इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी जोडी आहे. आता प्रश्न उद्भवतो की या परिपूर्ण जोडप्यामधून कोण अधिक कमावते? एका अहवालानुसार, सध्या शाहरुख खानची एकूण संपत्ती ५१०० कोटी आहे. तर गौरी खानची संपत्ती सुमारे १६०० कोटी आहे. यानुसार शाहरुख खान गौरीपेक्षा जास्त कमाई करतो. अहवालानुसार, गौरी आणि शाहरुखचे वार्षिक उत्पन्न २५६ कोटी आहे. २०१८ मध्ये एका मासिकाने गौरी खानचा ५० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता.