साऊथ चित्रपटांमधील या ख’ल’ना’य’कां’च्या पत्नी राहतात लाइमलाईट पासून दूर, जाणून घेऊया कोण आहेत हे खलनायक….

बॉलिवूडमधील कलाकारांप्रमाणेच साऊथच्या चित्रपटांतील कलाकार देखील जगभर प्रसिद्ध आहेत. या साऊथमधील कलाकारांचा मोठा चाहता वर्ग देखील निर्माण झालेला पाहायला मिळतो. या कलाकारांना चित्रपटांमध्ये मुख्य कलाकार म्हणून आपण पाहतो. या यादीत सलमान खानपासून साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांचा समावेश आहे, या कलाकारांच्या नावावरच चित्रपट हिट होतात. काही अभिनेते असे ही आहेत, जे त्यांच्या खलनायकी अभिनयासाठी मोठ्या सुपरस्टारसमोर देखील भारी पडतात. बॉलिवूडच्या जगात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी खलनायक बनून लोकांची मने जिंकली आहेत. त्याचप्रमाणे, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक खलनायक आहेत, जे आपल्या दमदार अभिनयाने वर्षानुवर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. पण हे कलाकार नेहमी त्यांचे वैयक्तिक आयुष्य या लाइमलाईटपासून दूर ठेवतात. एवढेच नाही तर या खलनायकांच्या पत्नीदेखील मीडियाच्या प्रसिद्धीपासून दूर आहेत. या लेखात, आज आपण या साऊथ चित्रपटांमधील प्रसिद्ध खलनायकांच्या पत्नींबद्दल जाणून घेणार आहोत.

१. प्रकाश राज – प्रकाश राज हे साऊथ चित्रपटांमधील एक मोठं नाव आहे. त्यांनी बॉलिवूडमधील सिंघम, हिरोपंती, भाग मिल्खा भाग यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रकाश राज यांची चित्रपट कारकीर्द फार यशस्वी ठरली आहे. त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत तब्बल १५५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण अभिनेते प्रकाश राज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले होते. प्रकाश राज यांनी दोन विवाह केले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव ललिता कुमारी होते. पण दोघांचा घ*ट*स्फो*ट झाला. यानंतर प्रकाश यांनी पोनी वर्मासोबत दुसरे लग्न केले. पोनी वर्मा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर असून त्या दिसायला अतिशय सुंदर आहेत.

२. आशिष विद्यार्थी – आशिष विद्यार्थी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. परंतु वास्तविक जीवनात, ते एक अतिशय शांत आणि आनंदी व्यक्ती आहे. आशिष विद्यार्थी हे हिंदी, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषिक चित्रपटांमध्ये काम करतात. यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका केल्या आहेत. आशिष विद्यार्थी यांची पत्नी बंगालची लोकप्रिय अभिनेत्री राजोशी विद्यार्थी आहे. त्या टीव्हीवरील हिंदी मालिका ‘सुहानी सी एक लडकी’ यामध्ये दिसल्या होत्या.

३. सयाजी शिंदे – सयाजी शिंदे हे साऊथ चित्रपटांमधील लोकप्रिय खलनायक आहेत. चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारे सयाजी शिंदे हे वास्तविक जीवनात अतिशय स्थायिक व्यक्ती आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव वंदना शिंदे आहे, त्या देखील दिसायला खूप सुंदर आहेत. अभिनेते त्यांचे वैयक्तिक आयुष्य या लाइमलाईटपासून दूर ठेवणे पसंत करतात.

४. प्रदीव रावत – प्रदिव रावत यांना देखील आपण अनेक साऊथ चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारताना पाहिलं आहे. प्रदीव रावत यांनी ‘गजनी’ चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. या चित्रपटात ते क्रू’र खलनायकाच्या भूमिकेत दिसले. प्रदीव यांच्या पत्नीचे नाव कल्याणी रावत आहे. त्यांना विक्रम आणि सिंह अशी दोन मुले आहेत. यांचे संपूर्ण कुटुंब प्रसिद्धीपासून दूर राहते.

५. मुकेश ऋषी – मुकेश ऋषी हे नाव साऊथसोबतच बॉलिवूड चित्रपटांमधील देखील मोठे नाव आहे. त्यांनी अनेक विविध ख’ल’ना’य’की भूमिका आजतागायत साकारल्या आहेत. मुकेश ऋषी यांना फॅमिली मॅन म्हणून देखील संबोधले जाते. मुकेश ऋषी यांच्या पत्नीचे नाव केश्नी ऋषि असे आहे. यांचा प्रेम विवाह झाला आहे. मुकेश ऋषी यांची पत्नीदेखील या लाइमलाईटपासून दूर राहणे पसंत करते.