सुशांत सिंह राजपूतला जेव्हा घरचे लग्नाबद्दल विचारायचे तेव्हा त्याच्याकडून यायचे हे उत्तर !

सुशांत सिंह राजपूतच्या नि*ध*ना*नंतर त्याचा परिवार, मित्रमंडळी आणि त्याचे फॅन्स दुःख सागरत बुडाले आहेत. सोशल मीडियावर लोक सुशांतची आठवण काढून त्याला श्रद्धांजली देत आहेत. सेलिब्रिटी, क्रीडाविश्वातील मंडळी व राजकारणातील लोक सुद्धा सुशांतशी निगडित आठवणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. सुशांतची मेहनत आणि त्याचा टीव्ही ते बॉलीवूड पर्यंतचा प्रवास आठवून लोक खूप भावूक होत आहेत. हल्ली सुशांत चा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा सुशांत सर्वात शेवटी त्याच्या वडिलांच्या घरी गेला होता त्यावेळी त्याच्या कुटुंबाने त्याला लग्नावरून काही प्रश्न विचारले होते.
https://www.facebook.com/watch/?v=968034473654161
थिएटर पासून टीव्ही आणि नंतर चित्रपटांपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करणारा सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारमधील पूर्णिया येथे राहणारा. त्याची बोलण्याची पद्धत आणि लकब यावरुन जरी तो बिहारी वाटत नसला तरी त्याला त्याची भाषा समजायची आणि बोलता देखील यायची. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे तो सुशांत सर्वात शेवटी बिहार ला गेला होता तेव्हाचा आहे. त्यावेळी त्याच्या जवळच्या व्यक्तींनी त्याला लग्ना बद्दल विचाराले होते. तेव्हा सुशांतने त्याच्या अंदाजात एकदम साधेपणाने त्याच्या घरच्यांना याचे उत्तर दिले होते.
या व्हिडिओमध्ये एक महिला सुशांतला विचारात आहे की लग्नाला सगळ्यांना घेऊन जाशील ना? याचे उत्तर देताना सुशांत या महिलेला बोलतो की आधी मुलगी तरी मिळू देत. सुशांत त्यांना सांगतो तुम्हीसुद्धा माझ्यासाठी कोणी मुलगी असेल तर शोधा. यावर ती महिला सुशांतला बोलते की बिहारच्या मुलीशी लग्न करशील का तर सुशांत बोलतो.. का नाही ! या व्हिडिओमध्ये सुशांत एकदम देसी अंदाजात दिसत आहे. तो घराच्या अंगणात बसून सर्वांशी गप्पा मारताना या व्हिडिओमध्ये दिसतो.
सुशांत च्या नि*ध*ना*नंतर अशी बातमी आली कि तो नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीने पोलिसांना सांगितले की ते दोघे लवकरच लग्न करणार होते.‌ सुशांत सिंह राजपूतने रविवारी १४ जून ला राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली होती. ही बातमी ऐकून त्याच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सुशांतच्या परिवाराने त्याच्या अ*स्थीं*चे विसर्जन करून त्याला शेवटचा निरोप दिला. यादरम्यान त्याच्या परिवारावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे स्पष्ट दिसत होते. त्याचे वडील व तीनही बहिणी सुशांत च्या आठवणीत भावूक झाले होते.