धोनी चित्रपट पाहून अभिनेत्री कॅटरिना कैफ सुशांत सिंह राजपूत बद्दल बोलली होती ही गोष्ट !

रविवारी १४ जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील बांद्रा येथे त्याच्या राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. सुशांतच्या अचानक निघून जाण्यामुळे त्याच्या फॅन्स सोबतच चित्रपट सृष्टी, क्रीडा विश्व आणि राजकारणातील मंडळींनी सुद्धा शोक व्यक्त केला आहे. सुशांत च्या नि ध ना नंतर त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर काही जण त्याची आठवण काढून त्याच्यासोबत चे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

याच दरम्यान सध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ चा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कॅटरिना सुशांतच्या एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाचे कौतुक करताना दिसते. हा व्हिडिओ तीन-चार वर्षे जुना असल्याचे सांगितले जात आहे. एका लाईव्ह चॅट सेशन दरम्यान कॅटरीना च्या एका चाहत्याने तिला विचारले होते की सध्याच्या कलाकारांपैकी कोणाचा अभिनय तुला जास्त आवडतो. या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री कॅटरिना कैफने सुशांत सिंह राजपूत चे नाव घेतले होते. कॅटरीनाने जेव्हा व्हिडिओ बनवला त्यावेळेस एम एस धोनी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे कौतुक करताना कॅटरीना म्हणाली की, धोनी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मला वाटते या चित्रपटात सुशांत ने खूप चांगले काम केले आहे. मी माझा मित्र गट्टू ( अभिषेक कपूर) ला भेटली होती. त्याने माझा फितूर हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यालासुद्धा सुशांत चे काम खूप आवडले. अभिषेकनेच सुशांतला काय पो छे या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली होती.
एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सुशांत गेला होता त्यावेळेस पत्रकारांनी सुशांतला सांगितले की तुझे एम एस धोनी या चित्रपटातील काम कॅटरीना कैफला खूप आवडले. याबाबतचा तिने एक व्हिडिओ सुद्धा तयार केला होता हे ऐकून खुद्द सुशांत सुद्धा खूप हैराण झाला होता. त्यानंतर सुशांतने कॅटरिना चे आभार मानले. कॅटरिना व्यतिरिक्त दिपिका आणि कृती सेनन चे सुद्धा व्हिडिओ समोर येत आहेत त्यामध्ये या दोघींनी सुशांतच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
करण जोहर च्या एका चॅट शोमध्ये अभिनेत्री कृति सेननला पाच अभिनेत्यांना त्यांच्या अभिनय क्षमतेला नुसार रॅंक देण्यास सांगितले होते. त्यावेळी कृतीने सर्वात पहिले नाव सुशांतचे घेतले. त्यानंतर वरुण धवन, कार्तिक आर्यन, आयुष्मान खुराना आणि टायगर श्रॉफ अशी रॅंक तिने दिली. तर एका इंटरव्यू दरम्यान दीपिकाने सांगितले होते की तिला सुशांतचा अभिनय खूप आवडतो.