सुशांत राजपूतच्या विषयामुळे ट्रोल झालेल्या करण जोहर यांनी उचलले हे पाऊल !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत सारख्या उत्कृष्ट अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण बॉलीवुड इंडस्ट्री सोबतच इतर सर्व क्षेत्रातील व्यक्ती सुद्धा सुशांत प्रति हळहळ व्यक्त करत आहेत. बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहरने नुकतेच एक आश्चर्यचकित करणारे पाऊल उचलले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर सोशल मीडियावर करण जोहर आणि आलिया भट सारख्या स्टार्सना सतत वाईट प्रकारे ट्रोल केले जात आहे.
करण जोहरवर सुशांत सिंह राजपूत चे फॅन्स त्याच्या संधी हिरावून घेतल्या बाबतचे आरोप लावत आहेत. तर आलियाला ट्विटरवर सुशांतचे फॅन्स नेपोटिजमचे प्रॉडक्ट म्हणून खूप सुनावत आहेत. याशिवाय नामांकित निर्माता दिग्दर्शक तसेच काही कलाकारांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांच्या फॉलोवर्स ची संख्या जलद गतीने कमी देखील होत आहे. या सर्व दरम्यान निर्मात्याने एक आश्चर्य करायला लावणारे पाऊल उचलले आहे. करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हजारो लोकांना अनफॉलो केले आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सध्या करण फक्त आठ लोकांना सोशल मिडियावर फॉलो करत आहे. यातील चार अकाउंट त्याच्या धर्मा प्रोडक्शन शी निगडीत आहेत आणि त्यामध्ये त्याची सीईओ अपूर्वा मेहता आहे व उर्वरित चार अकाउंट सेलिब्रिटींचे आहे ज्यामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अकाउंट आहेत. याबाबतची अधिक माहिती तुम्हाला खाली दिलेल्या स्क्रींनशॉट मधून समजेल.
यापूर्वी करण अनेक सेलिब्रिटींना फॉलो करायचा. सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूनंतर करण जोहर ने पोस्ट करून लिहिले होते की, ही हृदय तोडून टाकणारी गोष्ट आहे… आता माझ्याकडे फक्त आपण एकत्र घालवलेल्या चांगल्या आठवणीच आहेत… मी या गोष्टीवर अजूनही बिलकुल विश्वास ठेवू शकत नाही… तुझ्या आत्माला शांती लाभो. जेव्हाही कधी आपल्याला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी फक्त आपल्याकडे चांगल्या आठवणीच उरतात. एवढेच नव्हे तर करणने इंस्टाग्राम वर सुद्धा सुशांत साठी एक मोठी पोस्ट लिहिली आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूतने एवढे मोठे पाऊल उचलण्यासाठी त्याने स्वतःला दोषी ठरवले आहे.

करणने लिहिले की, या सर्व गोष्टीसाठी मी स्वतःला दोषी मानतो कारण गेली काही वर्षे मी तुझ्यासोबत संपर्कात नव्हतो. काहीवेळा मला असे वाटले होते की तुला तुझ्या आयुष्यात काही लोकांची आवश्यकता आहे पण तरीही मी तुझ्या त्या भावना समजू शकलो नाही. यापुढे मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही. आपण सर्व आपलं आयुष्य खूप उत्साहीत पणे आणि आनंदात जगतो पण काहीवेळेस आपल्यात आपल्याला कोणती तरी गोष्ट खात असते. आपल्याला फक्त मित्र बनवून चालत नाही तर त्यासाठी वेळ सुद्धा काढला पाहिजे. सुशांत तुझ्या मृ*त्यु*मुळे मी जागा झालो. यानंतर सुशांत सिंह राजपूत च्या फॅन्सनी करण जोहरला चांगले ट्रोल केले आहे. सुशांतला त्याच्या कठीण काळात सात न दिल्याबद्दल आणि त्याच्यापासून चांगल्या चांगल्या संधी हिरावून घेतल्या बद्दल करणला सर्वांनी दोषी ठरवले आहे.