बॉलिवूड अभिनेत्री ‘करिष्मा कपूर’च्या टी शर्टची किंमत आहे तब्बल एवढी, वाचून धक्का बसेल !

कपूर खानदानाची लेक करिष्मा कपूर ही ९० च्या दशकातील खूप लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने बॉलीवूड मध्ये अनेक हिट चित्रपट दिले. आधीच बॉलिवूडमधील श्रीमंत खानदानातून असल्याने आणि हिट चित्रपटांमधून बक्कळ पैसे कमावले. करिष्मा आता ४५ वर्षांची आहे. तिच्याकडे सध्या करोडो रुपयांची संपत्ती आहे. पण एवढे असून सुद्धा की डाऊन टू अर्थ राहणे पसंत करते. करिश्माचा जन्म भलेही कपूर खानदानात झाला असला तरी बॉलीवूड मध्ये ती स्वतःच्या मेहनतीवर यशस्वी झाली.
एकेकाळी करिश्माला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शकांच्या रांगा लागायचा. तिच्याकडे भरपूर चित्रपटांच्या ऑफर्स यायच्या. त्यामुळे या चित्रपटांच्या मार्फत ती भरपूर पैशांची वसुली करून घ्यायची. इतर वेळी करिष्मा अगदी साधे राहणे पसंत करते. ती फक्त पार्टी वगैरे यांसारख्या इव्हेंटमध्ये भारीतले कपडे घालते. पण इतर दिवशी ती एकदम साधी ड्रेसिंग करणे पसंत करते. आज आम्ही तुम्हाला करिश्माचा अशा एका ड्रेस बद्दल सांगणार आहोत याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

बॉलीवूड मध्ये अधिकतर अभिनेत्री महागडे ड्रेसेस घेणे पसंत करतात. या अभिनेत्रींच्या कपड्याची किंमत काही हजारांपासून ते लाखोंच्या किमतीत असतात. करिष्मा कडे सुद्धा अनेक महागडे कपडे आहेत मात्र याचा अर्थ हा नाही की ती तिच्या प्रत्येक कपड्यांवर पाण्यासारखा पैसा वाया घालवते. करोडो रुपयांची मालकीण असलेली करिष्मा कपूर सुद्धा स्वस्त कपडे घालवणे पसंत करते.
काही दिवसांपूर्वीच करिष्मा ब्लॅक पॅन्ट आणि लाल टी-शर्ट वर दिसली होती. हा फोटो करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर टाकला होता त्यामध्ये तिच्या टी-शर्टवर लव इज फ्री असे कॅप्शन लिहिले होते. करिश्माचा हा लाल टॉप टॉपशॉप या ब्रँडचा होता. या टी शर्टची किंमत फक्त १२०० रुपये होती. आपल्याला जरी ही किंमत महागडी वाटत असली तरी या सेलिब्रिटींच्या मध्ये किंमत एकदम स्वस्त अशीच आहे. असे नाही की करिश्माच्या प्रत्येक साध्या दिसणाऱ्या टॉप ची किंमत स्वस्त असेल.
काही दिवसांपूर्वीच करिष्मा बॅगी जीन्स वर ब्लॅक टॉप वर दिसली होती. तिचा हा टी-शर्ट Markus Lupfer ब्रँडचा होता. या टॉप ची किंमत तब्बल २६ हजार रुपये होती ‌ एवढ्या साधारण दिसणार्‍या टॉप ची किंमत तब्बल २६ हजार रुपये आहे हे ऐकल्यावर सगळेच अवाक झाले होते. करिश्माच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती अनेक फॅशन शो आणि इवेंटमध्ये उपस्थित असते तर नुकतीच तिची मेंटलहुड ही प्रदर्शित झाली होती.