सुशांत राजपूतच्या निर्णयाने कृती सॅनॉननी इंस्टाग्रामवर लिहली भावनिक पोस्ट !

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने रविवारी मुंबईच्या घरी ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. या दुख:द घटनेने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला हादरा बसला आहे. सोमवारी विलेपार्ले येथील पवन हंस स्म*शा*न*भू*मी घाटात सुशांतसिंग राजपूत यांच्यावर अं*त्य*सं*स्का*र करण्यात आले. बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सुशांतचे निकटचे मित्र या कार्यक्रमाला आले. त्यात एक अभिनेत्री कृती सॅनॉन देखील होती.

रविवारी घडलेल्या घटनेनंतर कृतीच्या सोशल मीडिया कडून कोणतेही पोस्ट आले नाही. सर्वांची नजर त्याच्या सोशल मीडियावर होती. आता सुशांतच्या मृत्यूच्या दोन दिवसानंतर कृती सेनन हिने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच कृतीने तिचे आणि सुशांतचे काही फोटोही शेअर केले आहेत.सुशांतसिंग राजपूत यांच्यासह फोटो शेअर करताना कृतीने लिहिले,  सुष, मला माहिती आहे तुझे प्रतिभाशाली मन तुझा सर्वात चांगला मित्र होता आणि सर्वात मोठा शत्रूदेखील. पण या गोष्टीने मी आतून पूर्णपणे खचले आहे कि तुला जगण्यापेक्षा मरणे सोपे वाटले होते.जर तुझ्याजवळ असे लोक असते जे तुझ्या या वाईट काळामध्ये तुझी मदत करू शकले असते आणि हा काळ सहजरित्या निघून गेला असता. जर तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना तू स्वतःपासून दूर केले नसते, तुझ्यामध्ये जे काही तुटले होते ते मला जोडता आले असते, पण असे करू शकले नाही. माझ्या हृदयाचा एक हिस्सा तुझ्यासोबत निघून गेला आहे आणि दुसर्या भागात तू कायम जीवंत राहशील.
कृती सॅनॉनने सुशांतसिंग राजपूत सोबत ‘राबता’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट तयार झाल्याने या दोघांच्या नात्याबाबत बरीच चर्चा झाली. तथापि, यापैकी कोणत्याही एकानेही या अहवालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. या बातम्या नेहमीच बातम्या म्हणून राहिल्या.