या कारणामुळे सलमान खानने त्याच्या चित्रपटात कधीच किसिंग सीन्स केले नाहीत !

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील काही हॉटस्टार हे एलिजिबल बॅचलर आहेत. त्यांच्या रोमान्स आणि अफेअरचे किस्से हे त्यांचा चोथा होईपर्यंत चघळले जातात. अभिनेता सलमान खानच्या बाबतीत हे अनेकदा घडले आहे. मात्र तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का की त्याने कधीच त्याच्या पहिल्या चित्रपटापासून ते आत्ता नुकत्याच येऊन गेलेल्या दबंग ३ या चित्रपटापर्यंत कोणत्याच अभिनेत्रीला ओन स्क्रीन किस केलेले नाही.
एका फोटो शूट दरम्यान अभिनेत्री भाग्यश्री खूप घाबरली होती. याचे कारण होते ते म्हणजे तिला एका फोटोशूटमध्ये सलमान खान ला किस करण्यास सांगितले होते. त्यावेळी भाग्यश्रीने तिच्या घरच्यांना न सांगता तिच्या प्रियकरासोबत म्हणजेच हिमालय यांच्या सोबत लग्न केले होते. कोणत्याही परिस्थितीत तिला तिच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण संपवायचे होते. सलमान खानला त्यावेळी तिची परिस्थिती समजली आणि त्याने त्याचे उत्तर कळवले. त्याच्या या अनपेक्षित उत्तरामुळे भाग्यश्री झाली आणि सलमान खान प्रति सन्मान तिच्या मनात वाढला. सलमान खानने फोटोग्राफरला सांगितले होते की तो कोणत्याही अभिनेत्रीच्या परवानगीशिवाय तिला किस करणार नाही.
सलमान खान ने आतापर्यंत त्याच्या प्रत्येक प्रियसींवर वेड्यासारखे प्रेम केले आहे. मात्र त्याने त्याच्या प्रेमाच्या किस्स्यांना त्यांना कधीच सार्वजनिकरीत्या जाहीर केले नाही. असे नाही की निर्माता-दिग्दर्शक सलमान खानच्या चित्रपटात किसिंग सीन ठेवतच नाहीत मात्र सलमान खानला स्वतःला ते आवडत नसल्यामुळे तो या सर्व गोष्टी वर्ज करतो.
काही वर्षांपूर्वीच एका मुलाखतीत सलमान खानने सांगितले की मी कंजरवेटीव्ह नाही आहे. पण मला हे ठाऊक आहे की माझे चित्रपट संपूर्ण परिवार एकत्र बसून पाहतात. एकदा सलमान खान त्याच्या संपूर्ण परिवारासोबत डिव्हिडीवर एक इंग्रजी चित्रपट पाहत होता त्यावेळी त्या चित्रपटात अनेक स्मूचिंग सीन येत होते. त्यामुळे सर्वजण शरमेने इथेतिथे पाहायचे. सलमान खान स्वतः त्याच्या आई वडिलांसमोर असे सीन पाहण्यास थोडा ऑकवर्ड होत होता. त्यावेळी तो असे सीन्स फास्ट फॉरवर्ड करायचा किंवा तेथून उठून दुसरीकडे निघून जायचा. त्याच वेळेस त्याने निर्णय घेतला की तो त्याच्या चित्रपटांमध्ये असे काही दाखवणार नाही जेणेकरून संपूर्ण कुटुंबासोबत असताना चित्रपट पाहण्यास लाज वाटेल.

ह्याच कारणामुळे सलमान खान पडद्यावर रोमँटिक सीन करताना या गोष्टीची विशेष काळजी घेतो की त्याचे चित्रपट पाहणारे लहान मुलं असो किंवा मोठे त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे.