सोनाक्षी सिन्हाचे बोलणे ऐकून कॉमेडी किंग कपिल शर्माचा चेहरा उतरला, म्हणून आला कपिल शर्माला राग

टीव्हीवरील प्रसिद्ध कथाबाह्य कार्यक्रम “द कपिल शर्मा शो” सर्वांच्या परिचयाचा आहे. त्या शो मध्ये घडणारे किस्से, जोक याचे व्हिडीओ तर आपण पाहतच असतो. या कार्यक्रमादरम्यान घडणाऱ्या घटनांमुळे हा शो अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. कपिल शर्मा शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटींसोबत काही ना काही असे जोक किंवा किस्से घडवत असतो, ज्यामुळे हा शो वादाचा भाग बनतो. हल्ली बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी गायक राशी सूदसोबत द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचली. पण शोमध्ये ती कपिलला असं काहीतरी म्हणाली, ज्यामुळे कपिलच्या तोंडाचे पाणी पळाले.
अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे ‘मिल माहिया’ हे गाणे रिलीज झाले आहे. ज्यामध्ये तिच्या स्टाईलला खूप पसंती मिळत आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी सोनाक्षी सिन्हा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली. पण तिने शोमध्ये प्रवेश करताच सोनाक्षी सिन्हाला कॉमेडी किंगला भैया (भाऊ) अशी हाक मारली. हे ऐकल्यावर जिथे अर्चना पूरन सिंह हसायला लागते आणि ते ऐकताच कपिल शर्माचा चेहराच उतरतो. सोनाक्षी आणि कपिलच्या या एपिसोडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘द कपिल शर्मा शो’च्या या व्हायरल व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा राशी सूदसोबत स्टेजवर प्रवेश करताना दिसत आहे आणि म्हणाली, “भाऊ, मी इतक्या दिवसांनी परत आली आहे.” तिचे बोलणे ऐकून अर्चना पूरन सिंह एक उसासा घेऊन हसायला लागली. तर कपिल शर्माने अभिनेत्रीला उत्तर देताना म्हटले, “आता माझ्या मुलांनीही मला विचारण्यास सुरुवात केली आहे की सोनाक्षी आत्या कधी येणार आहे?”

जेव्हा सोनाक्षी सिन्हा तिच्या ‘अकीरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आली होती, तेव्हा तिने कपिल शर्माला राखी बांधली. तेव्हापासून ती अनेकदा कपिल शर्माला भाऊ म्हणवून त्याची छेड काढताना दिसते. याशिवाय कपिल शर्मा देखील सोनाक्षीकडे दीपिका पदुकोणबद्दल तक्रार करताना दिसत आहे. त्याने दीपिकाबद्दल सांगितले की ती परफेक्ट नाही आहे, कारण तिने कपिल सोडून रणवीर सिंगशी लग्न केले.

वास्तविक, कपिल शर्माने सोनाक्षी सिन्हाला दीपिकाबद्दल विचारले की, “तू एकदा म्हणाली होतीस की तू दीपिका परफेक्ट आहे असं म्हणतेस.” सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “हो, ती परफेक्ट आहे.” तिच्या बोलण्यावर, कपिल शर्माने तक्रार केली आणि म्हणाला, “मला सोडून तिने रणवीर सिंगशी लग्न केले, मग ती परफेक्ट कशी असेल?” पण कपिलकडून हे ऐकल्यानंतर अभिनेत्रीने त्याच्या हातात केळी दिले होती.