मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूतने पाठीमागं सोडली एवढी संपत्ती, ती पाहून थक्क व्हाल !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवले. एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’ ‘काय पो छे’, ‘पीके’ या चित्रपटांतील त्याचा अभिनय सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. मात्र, इथपर्यंत येण्यासाठी सुशांत राजपूतने प्रचंड संघर्ष केला होता. सुशांतने दिल्लीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.
सुशांतने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की स्ट्रगलच्या दिवसात तो ६ लोकांसोबत रूम शेअर करायचा. त्यावेळी त्याला एका नाटकाच्या दौऱ्याचे २५० रुपये तसेच कधीकधी तो चित्रपटांमध्ये हिरो हिरॉईनच्या मागे बॅक डान्सर म्हणून सुद्धा काम करायचा. मुंबईत खूप वर्ष स्ट्रगल केल्यानंतर सुशांतला २००८ मध्ये बालाजी टेलीफिल्म्स द्वारे टीव्हीवर पहिला ब्रेक मिळाला तो म्हणजे किस देश मे है मेरा दिल या मालिकेतून. मात्र त्याच्या करिअरला खरी दिशा दाखवली ती २००९ ते २०११ मध्ये झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या पवित्र रिश्ता या मालिकेने. त्यानंतर सुशांतला २०१३ मध्ये काय पो छे या पहिल्या चित्रपट प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. इथून त्याचे करिअर हळूहळू वेग घेऊ लागले होते.
एकेकाळी मालाड येथील २ बीएचके मध्ये राहणाऱ्या सुशांतने २०१५ मध्ये पाली हिल येथे पेंट हाउस खरेदी केले. या पेंट हाउस ची किंमत तब्बल २० करोड रुपये होती. सुशांत त्याच्या घराच्या लिव्हिंग रूमला ट्रॅव्हलिंग म्हणायचा. त्याच्या घरातील भिंतींवर वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग तसेच अनेक अँटिक पिसेस , नॉस्टॅल्जिक आणि फ्यूचरिस्टीक अशा गोष्टी त्याच्या घराच्या कानाकोपऱ्यात ठेवलेल्या आहेत. सुशांत च्या घरात एक मोठा टेलीस्कोप आहे ज्याला तो टाईम मशीन म्हणायचा. कारण त्याद्वारे तो घरबसल्या वेगवेगळ्या ग्रहांना आणि आकाशगंगा ना पाहायचा.
सुशांतने एम एस धोनी आणि केदारनाथ यांसारखे हिट चित्रपट केले. आमिर खानच्या पिके चित्रपटातील कामाबद्दल सुद्धा त्याचे कौतुक करण्यात आले होते. एका चित्रपटासाठी सुशांत ५ ते ७ करोड रुपये फी घ्यायचा. सुशांतच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तो ५ मिलियन डॉलर इतक्या संपत्त्तीचा मालक होता. त्याच्या संपत्तीमधील जास्तकरून उत्पन्न हे चित्रपट आणि जाहिरातींमधून येत होते. सुशांतच्या कार कलेक्शनमध्ये १.५ करोडची मसेराटी क्वाट्रोपोर्टो यांसारख्या लक्झरी कारचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्याच्याकडे बीएमडब्ल्यू k1300R ही बाईक सुद्धा होती.
१७० बीएचपी जनरेट करणार्‍या या बाईकची किंमत २५ लाख रुपये होती. २०१८ मध्ये सुशांतने चंद्रावर जमीन खरेदी केली होती. त्याचा हा प्लॉट सी ऑफ मसकोवी मध्ये आहे. त्याने त्याच्या प्लॉटवर नजर ठेवण्यासाठी एक दुर्बीण सुद्धा खरेदी केली होती. त्याच्याकडे ॲडव्हान्स टेलिस्कोप 14LX00 होती. सुशांतने ही जमीन इंटरनॅशनल लूनर लँडस् रजिस्ट्री मधून खरेदी केली होती. सुशांतने २५ जून २०१८ मध्ये ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली होती. यात सुद्धा अनेक मालकी हक्कावरून वाद होते. कारण पृथ्वी व्हायरल दुनिया ही मानवविरहित असल्यामुळे तेथील जमिनीवर कोणत्याही एका देशाचा कब्जा होऊ शकत नाही. सुशांत हा पहिला असा अभिनेता होता ज्याने चंद्रावर जमीन खरेदी केली होती.