सुशांत सिंह राजपूतने आईसाठी लिहिलेले भावनिक पत्र होत आहे व्हायरल !

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने रविवारी ग*ळ*फा*स लावून जगाचा कायमचा निरोप घेतला. त्याच्याशी निगडीत अनेक आठवणी सध्या त्याच्या फॅन्सना भावूक करत आहेत. सध्या अनेक जण त्याच्या संबंधीच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सुशांत त्याच्या आईच्या किती जवळ होता आणि त्यांच्यावर किती प्रेम करायचा हे त्याने कित्येकदा दाखवून दिले होते. सध्या एक पत्र व्हायरल होत आहे. हे पत्र सुशांतने त्याच्या आईच्या नि*ध*ना*नंतर लिहिले होते. त्याचे हे पत्र मनाला खूप भावूक करणारे आहे.
ज्यात त्याने लिहिले आहे की आम्ही दोघांनी एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले होते. सुशांतचे हे पत्र वाचून त्याचे फॅन्स खूप इमोशनल होत आहेत. सुशांत त्याच्या आई संबंधीची संवेदना सोशल मीडियावर अनेकदा शेअर करायचा. तसेच अनेकदा इंटरव्यू दरम्यान सुद्धा त्याने आईला खूप मिस करत असल्याचे सुद्धा सांगितले होते.
सुशांतच्या आईचे नि*ध*न २००२ मध्ये झाले जेव्हा तो केवळ १६ वर्षांचा होता. या दुःखद घटनेनंतर सुशांतने मुश्किलीने स्वतःला सावरले होते. त्यानंतर तो स्ट्रगल करून टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करू लागला आणि बघता बघता त्याने स्वतःचे नाव उत्तमरित्या कमावले. सुशांतने हे पत्र २७ ऑगस्ट २०१६ ला लिहिले होते.
त्याने या पत्रात लिहिले आहे की, मी आता फक्त तुझ्या आठवणीतच जिवंत असतो…. एका सावलीप्रमाणे… एका क्षणासाठी… तो वेळ पुढे जातच नाही… ते खूप छान आहे… आणि हे कायम साठी आहे… पुढे त्यांनी लिहिले आहे आई तुला आठवत का तू मला वचन दिले होतेस की तू नेहमी माझ्यासोबत राहशील आणि मी सुद्धा तुला वचन दिले होते की मी काहीही झाले तरी नेहमी हसत राहिन… पण आता असे वाटते की आपण दोघेही चुकीचे होतो आई.

सुशांतचा जन्म बिहारमधील पटना येथे झाला. त्याचे वडील सरकारी ऑफिसर होते. सुशांतला तीन बहिणी होत्या आणि तो सर्वांचा लाडका भाऊ होता. सुशांत च्या बहिणीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्याची एक बहीण क्रिकेटर आहे. तर दुसरी बहीण परदेशात राहते. सुशांत च्या अशा अचानक जाण्याने मुळे त्याच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
सुशांतने दिल्लीमधून त्याची इंजीनियरिंग पूर्ण केली त्यानंतर तो थिएटर आणि डान्सिंग सोबत जोडला गेला. काही वर्ष स्ट्रगल केल्यानंतर त्याने टेलिव्हिजन दुनियेत एंट्री केली. तेथे त्याला खूप कमी काळातच लोकांनी नोटीस केले आणि तो प्रसिद्ध होत गेला. यामुळे त्याला एकापाठोपाठ एक काम मिळत गेले.
सुशांत त्याच्या आईच्या खूप जवळचा होता त्याच्या आईचे २००२ सालीच नि*ध*न झाले होते. त्याच्या आईच्या नि*ध*ना*नंतर सुशांतचे कुटुंब दिल्लीहून बिहारला शिफ्ट झाले होते. २०१९ मध्ये सर्वात शेवटी तो त्याच्या घरी गेला होता. गेल्या वर्षी तो तब्बल १७ वर्षांनी त्यांच्या शहरात गेला होता. तो तेथे गेल्यावर तेथील लोकांनी त्याचे अगदी मनापासून स्वागत केले. सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*ची बातमी ऐकून त्याच्या वडिलांना मोठा ध*क्का बसला आहे त्यामुळे ते सध्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत.