सुशांत सिंह राजपूत च्या बहिणीने केला मोठा खुलासा, सांगितले की तो ज्या महिलेला डेट करीत होता ती ……

यावर्षी बॉलिवूड अनेक दिग्गज कलाकारांना मुकले आहे. सर्वात आधी इरफान खान त्यानंतर ऋषी कपूर मग म्युझिक कंपोजर वाजिद खान आणि आता सुशांत सिंह राजपूत. असे एका मागोमाग एक दिग्गज कलाकार मिथुन जात आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी १४ जून ला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. सुशांत सिंह राजपूत च्या अशा अचानक आ*त्म*ह*त्या करण्यामुळे बॉलीवूडमध्ये सध्या भयानक वातावरण निर्माण झाले आहे.
इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता लागली आहे की सुशांत सिंह राजपूत सारख्या उत्कृष्ट अभिनेत्याचा आयुष्यात असे काय घडले म्हणून त्याने असे टोकाचे पाऊल उचलले. सुशांत सिंह राजपूतच्या अशा अचानक झालेल्या एक्झिटची वेगवेगळी कारणे मीडियामधून समोर येत आहेत.

नुकतेच एका वेबसाईट सोबत बोलताना त्याची बहीण मितू सिंह म्हणाली की, सुशांत मागील काही आठवड्यांपासून त्याच्या रिलेशन मध्ये आलेल्या ताणतणावामुळे त्रस्त झाला होता. मिळालेल्या रिपोर्टनुसार मितू सिंहने क्राईम ब्रांचला सांगितले की, तिचा भाऊ मागील काही दिवसांपासून खूप नैराश्येत होता. त्याचे वैयक्तिक आयुष्य फारसे ठीक चालू नव्हते. तो सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चढ-उतारांचा सामना करत होता. याबाबत आमच्या परिवाराला सर्व माहिती होती त्यामुळे आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे देखील होतो.
सुशांतच्या बहिणीने सांगितले की त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्याने लवकर लग्न करावे. मात्र आमच्या परिवाराला सुशांतच्या ताण-तणावाच्या रिलेशन बद्दल थोडीफार माहिती होती. आमच्या परिवाराला हेसुद्धा माहीत होते की सुशांतच्या मुलीला डेट करत आहे तिच्यासोबतचे नाते आता सामान्य राहिले नसून ती मुलगी ते नाते तोडून तिचे आयुष्य वेगळे जगू लागली होती.
मितू सिंह म्हणाल्या की याबाबत जेव्हा मला कळले तेव्हा मी त्या मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तिने माझे काहीही ऐकून घेतले नाही. सुशांत च्या जाण्याने संपूर्ण बॉलीवूड हादरले असून प्रत्येक जण सोशल मीडियावर त्यांच्या सोबत घालवलेल्या वेगवेगळ्या आठवणी शेअर करत आहेत.