या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचा झाला अपघात, पण अभिनेत्याने वेळेवर पोहचून केले हे काम !

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आणि डान्सर गोविंदाच्या मुलाचे म्हणजेच यशवर्धनचे २४ जून च्या रात्री कार एक्सीडेंट झाला . बुधवारी संध्याकाळी उशिरा म्हणजेच ८:३० दरम्यान मुंबईतील जुहू येथे अभिनेता गोविंदा च्या कारला एका दुसऱ्या कारने टक्कर मारली होती.‌ त्यावेळी कारमध्ये गोविंदा चा मुलगा यशवर्धन आहूजा होता. या अपघातानंतर स्वतः गोविंदा घटनास्थळी पोहोचला. तेथे पोहोचल्यावर गोविंदा आजूबाजूच्या लोकांसोबत बोलला. जुहू पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवली गेली नाही गोविंदा आणि समोरील व्यक्तीने आपापसातील समुजतदारी ने हे प्रकरण मिटवले.
या कार एक्सीडेंट मध्ये कोणालाही जास्त इजा झालेली नाही. गोविंदाने याप्रकरणी त्याची प्रतिक्रिया देऊन सांगितले की त्याचा मुलगा यशवर्धन सुरक्षित आहे. एकदा मीडियाशी बोलताना गोविंदाने सांगितले होते, एकदा माझा मुलगा यशवर्धन कार चालवत होता आणि अचानक समोरून एक कार येऊन धडकली. आता माझा मुलगा सुरक्षित आहे. त्याच्या हाताला थोडेसे खरचटले पण चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारला सुद्धा थोडेसे नुकसान झाले आहे. गोविंदाने पुढे सांगितले की त्याने या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली नाही कारण ड्रायव्हरने त्याची माफी मागितली.
ही गाडी यश चोपडा ची होती. त्याच्यासोबत आमचे खूप जुने संबंध आहेत. त्यावेळी यश चोपडा यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि तोसुद्धा सुरक्षित आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार एक्सीडेंट नंतर गोविंदा लगेचच घटनास्थळी पोहोचला त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांसोबतसुद्धा तो बोलला.