अपघातामध्ये बरबाद झाले या बॉलिवूड कलाकारांचे करियर, नाव वाचून थक्क व्हाल !

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कमी वयातच स्वतःचे नाव रोशन केले आहे. मात्र एका अपघातामुळे त्यांचे सर्व कमवलेले नाव धुळीस मिळाले. यातील काही कलाकार या अपघातातून सावरून स्वतःच्या कामांमध्ये पुन्हा एकदा व्यस्त झाले तर काही असेही आहेत जे कायम साठी प्रसिद्धीपासून दूर एखाद्या अंधार्‍या जगात हरवून गेले.‌ आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड स्टार्स बद्दल सांगणार आहोत.

चंद्रचूड सिंह –
माचिस या चित्रपटामधून अभिनेता चंद्रचुड सिंह याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. एकेकाळी त्याच्या अभिनयामुळे त्याची लोकप्रियता एवढी वाढली होती की चित्रपटांच्या ऑफर चा ढिगारा त्याच्यासमोर पडला होता. त्यामूळे वेळेअभावी यातील काही चित्रपट त्याला नाकारावे सुद्धा लागले होते. मात्र काळाच्या घाल्या पासून कोण रोखू शकतं ! चंद्रचुडला २००० मध्ये रस्त्यावर अपघात झाला या अपघातात त्याचा खांदा जबरदस्त जखमी झाला.
ही जखम इतकी खोल होती की यातून सावरण्यासाठी त्याला दहा वर्षाहून अधिक काळ लागला. अशा प्रकारे त्याचे करिअर संपुष्टात आले. मात्र सुष्मिता सेन हिच्या नुकत्याच आलेल्या आर्या या वेब सिरीज मधून अनेक वर्षांनी पुन्हा चंद्रचुड याने एकदा डिजिटल माध्यमातून पुनरागमन केले.
साधना –
60 व्या शतकातील सुंदर आणि घायाळ करणाऱ्या अदाकारांपैकी एक म्हणून अभिनेत्री साधना यांना ओळखले जायचे. यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले मात्र त्या एका अपघाताच्या शिकार या अपघातात त्यांच्या डोळ्यांना जबरदस्त मार लागला त्यामुळे पुढे त्यांचा संपूर्ण चेहराच बदलून गेला. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या स्क्रिनींग दरम्यान साधना यांना पाहिले गेले होते. मात्र त्यावेळी त्यांना कोणीच ओळखू शकले नाही. २०१५ मध्ये साधना यांचे निधन झाले.
अनु अग्रवाल –
आशिकी या चित्रपटात निरागस दिसणारी 21 वर्षांची अभिनेत्री अनु अग्रवाल हिला राहुल रॉय सोबत पाहिले गेले होते. या चित्रपटांमधून तिने स्टारडम मिळवले मात्र १९९९ साली मध्यरात्री एका पार्टी वरून घरी परत येताना तिची गाडी अचानक पलटली आणि गाडी वाईट रित्या चक्काचूर झाली. त्यानंतर अनु मुंबईमधील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये २९ दिवस कोमामध्ये होती.
कोमा मधून बाहेर आल्यावर अनुने तिची स्मृती गमावली होती. नंतर याददाश परत मिळवण्यासाठी ती बिहारमधील मुंगेर येथील योग विद्यालयामध्ये साधना करण्यास गेली. तिथे जाऊन तिची स्मृती परत आली मात्र तिच्या हातातून वेळ निघून गेला होता.
जीनत अमान –
एकेकाळची सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान या सुद्धा एका अपघाताच्या शिकार झाल्या होत्या. संजय खान यांच्यासोबत त्यांचे एकेकाळी अफेअर होते. मात्र नात्यात दुरावा आल्यानंतर रागाच्याभरात जीनत यांनी संजय खान यांना इतके मारले ही या मारामारीत त्यांच्या डोळ्याला जखम झाली. या सर्व प्रकरणात त्या त्यांच्या करिअर पासून हात धुऊन बसल्या.
सुधा चंद्रन –
बॉलीवूड मधील एक लोकप्रिय नृत्यांगणा आणि अभिनेत्री म्हणून सुधा चंद्रन यांची ओळख आहे. १९९१ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा रस्त्यात एक भीषण अपघात झाला होता या अपघातात त्यांचे पाय जखमी झाले. यामुळे त्यांना त्यांचा एक पाय कापावा सुद्धा लागला होता. त्यानंतर सुद्धा यांनी त्यांच्या कापलेल्या पाया बदली लाकडाचा पाय बसवून घेतला.
दोन वर्षानंतर सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा पुनरागमन केले आणि स्वतःचे नृत्य करणे सुरू ठेवले. मात्र २००६ नंतर काही मालिका सोडता त्या कोणत्याच चित्रपटांमध्ये दिसल्या नाहीत.