हे आहेत चित्रपट सृष्टी मधील सर्वात महागडे व्हिलन, एका चित्रपटासाठी घेतलेत तब्बल एवढे पैसे !

बॉलीवुड इंडस्ट्री असो वा हॉलीवुड यातील चित्रपट हे त्यातील प्रमुख नायक-नायिका मुळे चालतात असे म्हटले जाते. मात्र काही चित्रपटांना याबाबतीत अपवाद देखील ठरतो कारण काही चित्रपट हे त्यातील खलनायकी भूमिका मुळे गाजतात. हे खलनायक सुद्धा चित्रपटांच्या मार्फत बक्कळ पैसे कमावतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खलनायक काम मदर सांगणार आहोत जे निगेटिव्ह भूमिका साकारून करोडपती झाले आहेत.
१) मायकल बी जॉर्डन
२०१८ मध्ये आलेला ब्लॅक पॅंथर या चित्रपटांमध्ये एरिक ही दमदार खलनायिकी भूमिका अभिनेता मायकल बी जॉर्डन याने साकारली होती. या चित्रपटाने ऑस्कर हा नामांकित पुरस्कार सुद्धा जिंकला होता. मायकल बी जॉर्डन याला या चित्रपटासाठी ४.५ मिलियन डॉलर म्हणजेच बत्तीस करोड रुपये इतकी रक्कम मिळाली होती.

२) एंडी सर्किस
हॉलिवूड अभिनेता एंडी सर्किस हा अनेक चित्रपटांमध्ये व्हिलन बनला आहे. या अभिनेत्याने ब्लॅक पॅंथर या चित्रपटात क्लव ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात काम करण्यासाठी एंडीला १८ करोड रुपये मिळाले होते.

३) अक्षय कुमार
अक्षय कुमारने पहिल्यांदाच २.० या चित्रपटा मार्फत साउथ इंडियन चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात त्याने एका खतरनाक व्हिलन चे काम केले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ वीस दिवसांच्या शूटिंगसाठी अक्षय कुमारने चाळीस करोड रुपये घेतली होती.
४) टॉम हिडीलस्टन
हॉलीवुड मधील एवेंजर ही सिरीज खूप लोकप्रिय आहे. या सिरीज मधील लौकी ही व्हिलनची भूमिका जगभर प्रसिद्ध आहे. ही व्हिलनची भूमिका अभिनेता टॉम हिडीलस्टन याने साकारली होती. त्याला या भूमिकेसाठी सहा मिलियन डॉलर म्हणजेच ४२.८० करोड रुपये मिळाले होते.
५) जोष ब्रोलीन
एवेंजर सिरीज मधील सर्वात लोकप्रिय भूमिका ठरली ती म्हणजे थनोस या खलनायकाची. ही भूमिका अभिनेता जोश ब्रोलीन ने साकारली होती. त्याला या भूमिकेसाठी आठ मिलीयन डॉलर म्हणजेच ५७ करोड रुपये मिळाली होती.

६) अमीर खान
भारतीय हिंदी सिनेमा सृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खानने धूम ३ या चित्रपटांमधून पहिल्यांदाच व्हिलन म्हणून काम केले होते.‌ हे काम करण्यासाठी त्याने मोठी रक्कम सुद्धा घेतली होती. या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी चित्रपटाच्या प्रॉफिट सोबतच त्याने ७० करोड रुपये फी घेतली होती.