सुशांत सिंह राजपूत च्या अचानक जाण्यामुळे त्याचे हे चित्रपट राहिले अधुरे !

रविवारी १४ जून २०२० ला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने या जगाचा कायमचा निरोप घेतला. सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. याप्रकरणी पोलिसांची सध्या तपासणी चालू आहे. मृत्यूपूर्वी टेलिव्हिजन आणि चित्रपटातील लोकप्रिय चेहरा सुशांत सिंह राजपूत कडे चार ते पाच चित्रपट होते. या चित्रपटांवर तो काम करणार होता मात्र ते चित्रपट आता अधुरेच राहिले. सुशांतच्या आयुष्यासोबतच त्याची स्वप्ने आणि त्याचा प्रवास देखील संपला. जेव्हा सुशांतने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते तेव्हा त्याच्या पदार्पणाच्या वेळीच त्याला येणाऱ्या काळातील सुपरस्टार म्हणून घोषित केले होते. एम एस धोनी या चित्रपटामुळे त्याने सर्वांची मने जिंकून घेतली पण त्याचबरोबर १०० कोटी क्लबमध्ये सुद्धा स्वतःची जागा बनवली.
परंतु यादरम्यान सुशांतचे असे अनेक प्रोजेक्ट आहेत जे खूप काळापासून पाईपलाईन मध्ये आहेत. २०१९ मध्ये एका इंटरव्यूच्या वेळी सुशांतने सांगितले होते की, केदारनाथ नंतर त्याच्याकडे बारा चित्रपटांच्या ऑफर आहेत. सध्या सुशांत पुढील काही चित्रपटांवर काम करत होता पण त्याच्या अचानक जाण्यामुळे हे चित्रपट अधुरेच राहिले.

दिल बेचारा – इंग्रजी चित्रपट The fault in our star या चित्रपटाचा रिमेक म्हणजेच दिल बेचारा हा चित्रपट आहे. या चित्रपटामार्फत मुकेश छाबरा दिग्दर्शन दुनियेत पाऊल ठेवणार आहेत. तसेच या चित्रपटातील अभिनेत्री संजना सांघी सुद्धा बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून लवकरच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो.
रायफल मॅन- २०१९ मध्ये सुशांतने त्याचा पुढील चित्रपट रायफल मॅन ची घोषणा केली होती. हा चित्रपट १९६२ मध्ये झालेल्या इंडिया चायना वॉर मधील हिरो रायफल मॅन जसवंत सिंह यांच्यावर आधारित आहे.‌
इमरजेन्स- शिप ऑफ थिसियस फेम चित्रपट निर्माता आनंद गांधी यांचा पुढील चित्रपट हा सायन्स फिक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट चार वैज्ञानिकांवर आधारित आहेत जे जगाला वाचवण्यासाठी एका महामारी सोबत लढत असताना या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. हा चित्रपट सुरुवातीला इरफान खान करणार होते मात्र त्यांच्या निधनानंतर हा चित्रपट सुशांत कडे दिला गेला.
तकढुम – दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्या तकढुम या चित्रपटात सुशांत आणि परिणीती चोपडा ही जोडी दिसणार होती. पण काही कारणास्तव तो चित्रपट बंद झाला. यासोबतच सुशांत, शेखर कपूर सोबत सुद्धा एक चित्रपटावर काम करत होता. या चित्रपटाचे नाव पानी असे होते. या चित्रपटासाठी खूप तयारी, रिसर्च आणि रिहर्सल सुद्धा झाली होती. मात्र यश राज फिल्म्स प्रोडक्शन कंपनीने या प्रोजेक्टमधून हात काढून घेतले त्यामुळे हा चित्रपट अर्धवट राहिला. तसेच सुशांत चंदू मामा दूर या नावाच्या अंतरिक्षा वर आधारित चित्रपटामध्ये सुद्धा काम करणार होता परंतु बजेटच्या कारणामुळे हा चित्रपट अडकला होता.