या चुकांमुळे गोविंदाचे करिअर डबघाईस गेले, जाणून घ्या त्यापाठीमागची कारण ! ! 

जेव्हा केव्हा अभिनेता गोविंदा चे नाव येते त्यावेळी सर्वात आधी आपल्याला त्याचा डान्स आठवतो. एकेकाळी सुपरहिट हीरोंच्या यादीत येणारा गोविंदा आजच्या काळात कुठेतरी गायब झाला आहे. गायब होण्याचा हा अर्थ नाही की तो चित्रपट करत नाही मात्र चित्रपट करून देखील त्याच्यामध्ये आता पहिल्यासारखी गोष्ट राहिली नाही. त्यामुळे त्याचे स्टारडम आता कुठेतरी संपुष्टात येऊ लागले आहे. याच कारणामुळे गोविंदा सध्या त्याच्या करिअरमधील अत्यंत वाईट काळातून जात आहे.
गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जरी खूशअसला तरी त्याच्या काही चुकांमुळे तो त्याच्या चाहात्यांपासून दूर झाला आहे. त्यामुळे आता गोविंदाचा कोणताही चित्रपट प्रदर्शित जरी झाला तरीही तो आधी सारखा हिट ठरत नाही. पूर्वी चित्रपट हिट होण्यासाठी गोविंदा हे नावच खूप असायचे. मात्र आता ते दिवस फिरले असून एकेकाळी फक्त गोविंदा या नावाने हिट होणारे चित्रपट आता साधे चर्चेत सुद्धा येत नाहीत. नुकताच गोविंदाचा फ्रायडे हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल अनेक लोकांना अजूनही ठाऊक देखील नाही. अनेकांना तर हा चित्रपट प्रदर्शित झाला असल्याचे सुद्धा माहित नाही त्यामुळे सध्या गोविंदाची हालत खूप खराब असल्याचे म्हटले तरीही ते वावगे ठरणार नाही.
आज आम्ही तुम्हाला गोविंदाचा त्या चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे त्याचे करिअर डबघाईस आले. ९० च्या काळातील सुपरस्टार आज त्याच्या लोकप्रियतेला शोधत आहे. एकेकाळी गोविंदाने शाहरुख आणि सलमान ला लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले होते. मात्र हल्ली त्याचे चित्रपट असे प्रदर्शित होतात जसे काही कोणी नवा हीरो पदार्पण करत आहे. गोविंदाने त्याच्या करिअरमध्ये अनेक चुका केल्या ज्यामुळे त्याला आज हे दिवस पहावे लागत आहेत.

१) या मधील पहिली चूक म्हणजे किंग मेकर सोबत झालेले भांडण ! गोविंदाच्या आयुष्यात डेव्हिड धवन हे एक किंगमेकर म्हणून आले होते. त्यांनी गोविंदा सोबत खूप काम केले मात्र गोविंद झाले त्यांच्या सोबत भांडण केले त्यामुळे डेव्हिडने त्यांचे काम गोविंदाच्या बदली त्यांचा मुलगा वरुण धवन ला देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता गोविंदा गायब झाला आहे.
२) गोविंदाने वेळे सोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे देखील सोडून दिले. यामुळे त्याला चित्रपट मिळणे बंद झाले. त्यामुळे हळूहळू गोविंदा चे नाव बॉलिवूड दुनियेतून कमी होऊ लागले.
गोविंदा बद्दल बोलायचे झाल्यास त्याचा जन्म २१ डिसेंबर १९६३ झाला. गोविंदाला बारा वेळा फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते यापैकी फिल्मफेअरचा एक विशेष पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले तसेच सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा फिल्मफेअर पुरस्कार देखील गोविंदाला मिळाला. गोविंदाने १९८६ मध्ये आलेल्या इल्जाम या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने १६५ हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.