माधुरी दीक्षित सोबत हिट चित्रपट देऊन देखील संजय कपूर चे इंडस्ट्रीमध्ये करियर होऊ शकले नाही !

नशीब कोणाचे कधी चमकेल किंवा कधी आपटेल हे सांगता येत नाही. आज सुपरस्टार असलेला कलाकार उद्या तो सुपरस्टार असेलच असे नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे लोकप्रियतेच्या शिखरावर आला हात लावून पुन्हा मागे जमिनीवर आले. असाच एक अभिनेता म्हणजे कपूर परिवारातील संजय कपूर ! संजय कपूर यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९६५ मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडील सुरिंदर कपूर हे स्वतः चित्रपट निर्माता होते.संजय कपूर यांच्या सोबत बोनी कपूर आणि अनिल कपूर हे दोघेही सुरिंदर कपूर यांची मुलं आहेत.चला तर मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्याशी निगडित काही गोष्टी सांगतो.
संजय कपूर यांनी १९९५ मध्ये अभिनेत्री तब्बू सोबत प्रेम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डब्यू केला होता. या चित्रपटाचे प्रदर्शन बरेच लांबणीवर गेले त्यामुळे त्याचा फरक या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस वर पडला. यानंतर संजय कपूर ने राजा या चित्रपटात काम केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित दिसली होती. त्याकाळी हा चित्रपट हिट झाला आणि यामुळे संजय कपूर रातोरात सुपरस्टार झाले.

संजय कपूर यांनी त्याच्या नंतर औजार, मोहब्बत, सिर्फ तुम हे चित्रपट केले. मात्र या चित्रपटांचा संजय कपूरचा करिअरला काहीच फायदा झालेला नाही. २००२ मध्ये त्यांनी कोई मेरे दिल से पूछे या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली. या चित्रपटात जरी संजय कपूरचे अभिनयाचे भरपूर कौतुक झाले तरीही त्याकाळी तो चित्रपट फ्लॉप ठरला.

त्यानंतर अजय देवगन नायक असलेला चित्रपट कयामत मध्ये संजय कपूर यांनी एका आ तं क वा दी यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. संजय कपूर यांनी निर्माता म्हणून तीन चित्रपटांची निर्मिती केली आहे. यातील एक चित्रपट त्यांनी त्यांचा पुतणा अर्जुन कपूर ला घेऊन बनवला. ह्या चित्रपटाचे नाव तेवर असे होते. या चित्रपटात अर्जुन कपूर सोबत सोनाक्षी सिन्हा दिसली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नसला तरी ही निर्माता म्हणून संजय कपूरचे कौतुक झाले.
चित्रपटारांव्यतिरिक्त संजय कपूर यांनी २००३ मध्ये अभिनेत्री करिष्मा कपूर सोबत टीव्ही मालिका करिश्मा- द मिरैकल ऑफ डेस्टिनी’ मध्ये काम केले. करियर च्या दुसऱ्या टप्प्यात संजय कपूर मिशन मंगल आणि लव्ह स्टोरीज या चित्रपटात दिसले.

१९९७ मध्ये संजय कपूर यांनी एनआरआय असलेल्या महीप कपूर सोबत लग्न केले. या दोघांना शनाया कपूर आणि जहां कपूर ही दोन मुलं आहेत. संजय कपूर ची मुलगी शनाया कपूर आतापासूनच सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. ती अनेकदा स्टार किड्स सोबत पार्टी आणि इव्हेंटमध्ये दिसते. येत्या काही दिवसात शनाया बॉलिवूड मध्ये पदार्पण करू शकते.