जेव्हा करीनाने दहा वर्ष मोठ्या असलेल्या सैफ सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोकांनी दिली होती ही चेतावनी !

जगभर पसरलेले कोरोनाचे सावट अजूनही कमी व्हायचे चिन्ह दिसत नाही. संपूर्ण जगभरात या महामारी मुळे लोक दहशतीत जगत आहेत. कित्येक हजारोच्या संख्येत लोक मृत्यूच्या तोंडी जात आहेत. भारतात सुद्धा या महामारी पासून वाचण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र यात सुद्धा काही सूट देण्यात आली आहे यामध्ये सर्वसामान्य लोकांसारखे सेलिब्रेटी सुद्धा आवश्यक कामांसाठी बाहेर पडू शकतात. तरीही सेलिब्रिटी घरातून जास्त बाहेर पडत नाहीत. अशातच या सेलिब्रिटी कलाकारांची निगडीत अनेक किस्से, गोष्टी ,फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान करीना कपूर चा इंटरव्यू व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने सैफसोबत केलेल्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. चला तर जाणून घेऊ काय आहे तो खुलासा !
करीना कपूर काही वर्षांपूर्वीच करण जोहरच्या चॅट शोमध्ये गेली होती. त्यावेळी तिने तेथे तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल अनेक खुलासे केले. करीनाने सांगितले की सैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अनेक लोकांनी मला यासाठी विरोध केला. काही लोकांनी तर मला चेतावणी सुद्धा दिली होती कारण तो याआधी विवाहित होता शिवाय त्याला दोन मुलं सुद्धा होती. करीना म्हणते की लोक आपल्या प्रेमाबद्दल खूप विचार करतात याचा मला खूप आनंद वाटतो.
जेव्हा मी सैफ सोबत लग्न करू इच्छित होते तेव्हा प्रत्येक जण माझ्यासोबत वेगळाच व्यवहार करायचे कारण त्याला आधीच दोन मुलं होती शिवाय तो घटस्पोटीत होता. काही लोक तर मला सारखे विचारायचे की तुला खरंच सैफ सोबत लग्न करायचे आहे का? ते असे बोलायचे जसे की सैफ सोबत लग्न झाल्यानंतर माझे करियर संपून जाणार आहे. त्यांचे हे सर्व बोलणे ऐकून एकेकाळी मला असे वाटायचे की प्रेमात पडणे हा खूप मोठा अपराध आहे. लग्न करणे हा खूप मोठा अपराध असू शकतो! मात्र तरीही मनात म्हटले की एकदा करून बघूया आणि पाहूया पुढे काय होते ते.
करीना आणि सैफ ची प्रेम कहानी एवढी साधी सुद्धा नाही आहे जेवढे ती वाटते. टशन या चित्रपटात काम करण्याआधी हे दोघांनी ओमकारा आणि एलओसी कारगिल या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र तशा चित्रपटाच्या वेळी जेव्हा ते भेटले त्यावेळी करीनाचे करिअर फारसे ठीक चालले नव्हते आणि शाहिद सोबतचे नाते सुद्धा बिघडत चालले होते. अमृता सिंह सोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यावेळी सैफ सिंगल येत होता आणि करीनाच्या प्रेमात पडू लागला होता. जेव्हा कशाला या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले त्यावेळी सैफने करीना ला प्रपोज केले. पण करिनाने मी तुला नीट ओळखत नाही असे सांगून नकार दिला. त्यानंतर सैफने करीनाला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या नावाचा टॅटू बनवून घेतला. टशन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संपूर्णपणे आपटला मात्र त्याच वर्षी प्रदर्शित झालेला करीना आणि शाहीदचा जब वी मेट हा सुपरहिट ठरला.
जब वी मेट च्या यशानंतर करीनाला थोडे मोकळे वाटू लागले. त्यानंतर तिने सैफ बद्दल विचार करण्यास सुरू केले. एका मुलाखतीत करीनाने सांगितले होते की सैफने तिला ग्रीस आणि लदाख या दोन ठिकाणी लग्नासाठी प्रपोज केले होते. त्याने मला सांगितले की आपण लग्न केले पाहिजे. पण त्यावेळी मला काही नीट समजत नव्हते म्हणून मी तुला नीट ओळखत नाही असे मी त्याला म्हणाले. माझे असे म्हणणे हा माझा नकार नव्हता पण ती माझी एक पद्धत होती ज्यात मी त्याला सांगत होती की मी तुला अजून जाणू इच्छिते! सैफ आणि करीनाने १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये लग्न केले. या दोघांमध्ये दहा वर्षांचे अंतर आहे. सैफ करीना पेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे. आता या दोघांना तीन वर्षाचा मुलगा आहे ज्याचे नाव तैमुर अली खान असे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !