करोडो रुपये संपत्तीचा मालक असलेला सुशांत राजपूत मनाने पण होता राजा, करोडो रुपये केले होते दा न !

सुशांत सिंह राजपूतने रविवारी त्याच्या राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म *ह*त्या केली. तो ३४ वर्षांचा होता. सुरुवातीला या आ*त्म*ह*त्ये*मागील आर्थिक अडचणी हे कारण असल्याचे सांगितले जात होते मात्र तपासणीनंतर असे अजिबात नसल्याचे दिसून आले. सुशांत सिंह राजपूत चे करिअर चांगले चालू होते त्याला पैशांची कोणतीच कमी नव्हती. याउलट सुशांत त्याच्या फॅन्सच्या सांगण्यावरून स्वतः त्यांच्या नावे दा*न करायचा आणि फॅन्सना त्रास करून घेऊ नका असा सल्ला द्यायचा.
सुशांत सिंह राजपूतने अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोबत एक घर भाड्याने घेतले होते. या घरासाठी सुशांत सिंह राजपूत दर महिना ४.५ लाख रुपये भाडे द्यायचा. त्याच्या राहणीमाना बद्दल बोलायचे झाल्यास तो अगदी एखाद्या राजाप्रमाणे राहायचा. सुशांत कडे अनेक महागड्या गोष्टी होत्या ज्या त्याने त्याचा एक छंद म्हणून खरेदी केल्या होत्या. याव्यतिरिक्त सुशांत सिंह राजपूत ६० करोड रुपयांच्या संपत्तीचा मालक होता. अगदी कमी वेळात त्याने खूप मोठे यश संपादन केले होते. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात वयाच्या २२ व्या वर्षी केली होती आणि या १२ वर्षांच्या काळात तो बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला होता.
सुशांत सिंह राजपूत त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी ५-७ करोड रुपये फी घ्यायचा. त्याच्या खात्यात एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी यासारखा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. तर छिछोरे सारख्या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा दुप्‍पट कमाई केली होती. असे म्हटले जाते की छिछोरे चित्रपटानंतर सुशांतची फि वाढणार होती किंवा आधीच वाढली होती.
सुशांतच्या कार कलेक्शनमध्ये १.६३ करोडची मसेराटी क्वाट्रोपोर्टो, ९० लाख ते १ करोड पर्यंतची एक शानदार SUV यांसारख्या लक्झरी कारचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्याच्याकडे बीएमडब्ल्यू k1300R ही बाईक सुद्धा होती. १७० बीएचपी जनरेट करणार्‍या या बाईकची किंमत २५ लाख रुपये होती. तो त्याच्या बाईकवर खुप प्रेम करायचा. सुशांतने बोईंगचे बेसिक फ्लाईट सिम्युलेटर खरेदी केले होते याचा उपयोग पायलेट ट्रेनिंग दरम्यान करतात. सुशांत सध्या फ्लाइंग चे धडे घेत होता आणि लवकरच त्याला अधिकृत रित्या पायलटचे सर्टिफिकेट सुद्धा मिळणार होते.
सुशांतला एका फॅनला आठ लाख रुपयांच्या किडनी ट्रान्सप्लांटची गरज होती. त्यावेळी सुशांतने चॅरिटी मार्फत पैसे गोळा करून त्या व्यक्तीला पैशांची मदत केली होती. त्यावेळी तो स्वतःही ते पैसे देऊ शकत होता, असे लोकांनी त्याला विचारले मात्र त्यावर सुशांत म्हणाला की, चॅरिटी कशा प्रकारे काम करते हे पाहणे चुकीचे आहे. आणि माझ्या पैशांचा उपयोग कसा करावा हे पाहणे माझे काम आहे.
त्याच्या एका चाहात्याने इंस्टाग्राम वर त्याला मेसेज केला होता की केरळ महापुराच्या पिडीतांना मला मदत करण्याची इच्छा आहे मात्र पैशांच्या अडचणीमुळे मी ते करू शकत नाही, ती मी कशी करू हे मला सांगा ? त्यावेळी सुशांतने वेळ न दवडता केरळला त्या व्यक्तीच्या नावे एक करोड रुपये दा*न केले होते.
त्यानंतर जेव्हा उत्तरपूर्व राज्यांमध्ये महापूर आला होता तेव्हा सुशांतने नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना १.२५ करोडो रुपये दा*न केले होते आणि सर्वकाही ठीक झाल्यावर कोहिमाला येण्याचे वचन दिले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !