शक्ती कपूर, श्रद्धा कपूरला चित्रपटाचे शूटिंग करण्याची परवानगी देत नाही, जाणून घ्या कारण !

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस ची दहशत पसरली आहे ‌ या खतरनाक व्हायरस च्या विळख्यात आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोक सापडले आहेत. दिवसेंदिवस या कोरोनाच्या महामारी चा प्रभाव वाढत चाललेला दिसतो. या धोरणामुळे सध्या सर्व चित्रपट आणि मालिकांची शुटींग थांबवली गेली होती मात्र सरकारने दिलेल्या नव्या गाईडलाईन्स मध्ये अनलॉक १ मध्ये चित्रपट आणि टीव्ही मालिकांची शूटिंग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.
नव्या नियमानुसार कमीत कमी क्रु मेंबर्सना घेऊन शूटिंग चालु केली जाऊ शकते. नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये शक्ती कपूरने सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलीला श्रद्धा कपूरला शूटिंग करण्याची परवानगी सध्या नाही दिली आहे. टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना शक्ती कपूर ने सांगितले की येणाऱ्या पुढील काही काळात मी स्वतः बाहेर जाऊन काम करणार नाही तसंच मी माझ्या मुलीला देखील काम सुरू करू देणार नाही.

बाहेरील परिस्थिती अजून योग्यरित्या ठीक झालेली मला वाटत नाही शिवाय अजून सर्वात जास्त वाईट काळ यायचा बाकी असल्याचे मला जाणवते. त्यामुळे अशा भयानक परिस्थितीत मी माझ्या मुलांना बाहेर जाऊ देऊ शकत नाही. काम हे महत्त्वाचे असते हे मला माहित आहे पण कोणत्याही कामाची किंमत एखाद्या जीवा इतकी महत्त्वाची नसते.
मला अजून देखील असे वाटते की कोणीही शूटिंग सुरू करू नये. मी माझ्या इंडस्ट्रीमधील ग्रुप च्या लोकांना नेहमी सांगत असतो की हॉस्पिटल मधील बिल भरण्यापेक्षा घरी बसून बाहेरील परिस्थिती ठीक होण्याची वाट पहा कारण अजूनही बाहेर खूप खराब परिस्थिती आहे. शक्ती कपूर यांनी पुढे सांगितले की सध्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत तसेच हॉस्पिटल मधील लोक इलाजासाठी खूप पैसे चार्ज करतात.
नुकतेच कानावर एक बातमी आली होती की एका व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये बेडवर बांधून ठेवले होते कारण तो त्याच्या बिलाचे पैसे भरण्यास असमर्थ होता. मी या गोष्टीवर एक व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. संपूर्ण जग सध्या खूप दुःखातून जात आहे पण तरीही सध्या कोणतीच माणुसकी नावाची गोष्ट उरलेली नाही.