सुशांतने या व्यक्तीला केला होता शेवटचा फोन, सेलिब्रिटींनी केली हळहळ व्यक्त !

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत रविवारी त्याच्या राहत्या घरी फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो नैराश्याने ग्रस्त असल्याचे म्हटले जाते. आधीच संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी झुंजत असताना त्यात एकापाठोपाठ एक उत्कृष्ट कलाकारांच्या मृत्यूमुळे सर्वजण हादरले आहे. सुशांतने ग*ळ*फा*स लावून घेतला याबाबतचे कोडे अजूनही सुटलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सोबत त्याचे काही मित्र होते. रात्री तो खूप उशिरा त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता सकाळी तो फक्त एकदाच बाहेर आला त्यानंतर त्याने जो दरवाजा लावून घेतला तो नंतर उघडलाच नाही. मित्र आणि नोकराच्या मदतीने दरवाजा उघडल्यावर समोर सुशांतचा मृ*त*दे*ह लटकलेला दिसला. सुशांत ची बॉडी पोस्टमार्टम साठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली आहे. आ*त्म*ह*त्या करताना त्याने हिरव्या रंगाच्या कपड्याचा फास लावून घेतला होता. पोलिसांना त्याच्या खोली मधून कोणतीच सु*सा*ई*ड नोट मिळाली नाही त्यामुळे त्याच्या आ*त्म*ह*त्ये*वर संशय घेतल्या जात आहे. या सर्व गोष्टीचा तपास आता क्राइम ब्रांच करत आहे.
नुकतेच असे समोर आले की सुशांतने मरण्यापूर्वी सर्वात शेवटचा कॉल त्याचा मित्र आणि अभिनेता महेश कृष्णा शेट्टीला केला होता. मात्र सुशांत से त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही कारण त्यांनी फोन उचलला नव्हता. असे म्हटले जाते की कदाचित सुशांतला त्याच्या जवळच्या व्यक्तीशी बोलायचे होते काही शेअर करायचे असेल म्हणून त्याने महेश कृष्ण शेट्टीला फोन केला.
सुशांत सोबत त्याच्या घरात जेवण बनवणारे दोन कुक, एक नोकर आणि एक आर्ट डिझायनर राहायचे. ही बातमी पोलिसांना त्याच्या हाऊस स्टाफ पैकी एकाने दिली होती. पोलिसांना सुशांतच्या घरातून काही कागदपत्र भेटली ज्यात डॉक्टरांनी दिलेल्या मेंटल ट्रॉमा च्या औषधांच्या रिसिप्ट होत्या. याचाच अर्थ तो कोणत्यातरी नैराश्यातून जात होता. याच दरम्यान अर्जुन बिजलानी ने सुशांत सोबत झालेल्या शेवटच्या संवादाचा एक व्हाट्सअप स्क्रीनशॉट शेअर केला आहे. अर्जुन ने सुशांतला मेसेज करून म्हटले होते की ‘अशी आशा व्यक्त करतो ही सर्व काही तुझ्यासोबत ठीक चालू आहे’ या स्क्रींनशोट पोस्ट केल्यावर अर्जुन ने त्याखाली कॅप्शन लिहिले की हा माझा त्याला सर्वात शेवटचा मेसेज होता.
मला त्याच्याबद्दल काहीतरी जाणवले होते. पण असो तु आता हे वाचले असेल. मला आपली बालकनी नेहमीच आठवेल. आता तू खुश रहा. तू नेहमी म्हणायचा की मी इतिहास लिहिन. पण आता मला माहित आहे तू जिथे कुठे आहेस तिथे खुश आहेस. तुझ्या अशा अचानक जाण्याने खूप काही बदलून जाईल. पण जसा मी रोज म्हणतो तुझ्यासाठी कोणतेच रेस्ट इन पीस नाही.
सुशांत साठी बॉलिवूड, क्रिकेट तसेच राजकारणातील सुद्धा अनेक व्यक्तींनी भावूक पोस्ट टाकल्या आहेत.‌ अनेक आणि त्याच्या सोबतच्या काही आठवणी सुद्धा शेअर केले आहे. त्याचे असे अचानक जाणे सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले.