या कारणामुळे करिना आणि करिश्माने चित्रपटांमध्ये एकत्र केले नाही काम…..

बॉलिवूडमधील कपूर कुटुंबीय तर सर्वांच्या परिचयाचे आहेत. कपूर कुटुंबातील जवळ जवळ प्रत्येक पिढी अभिनय क्षेत्रात आहे. या कपूर कुटुंबाला भारतीय सिनेमामधील पहिले कुटुंब म्हणून संबोधले जाते. या कुटुंबातील “पृथ्वीराज कपूर” हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनंतरच्या पिढीतील प्रत्येकाने बॉलिवूडमध्ये येत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याच कुटुंबातील दोन प्रसिद्ध अभिनेत्री ज्या अभिनय देखील आहेत, त्यांच्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. करीन कपूर आणि करिश्मा कपूर या दोघी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध व यशस्वी अभिनेत्री असल्या तरीही या दोघांनी कधी ही कोणत्या चित्रपटामध्ये एकत्र काम केले नाही, चला तर पाहूया यामागील काय कारण आहे….

करिश्मा कपूरने अनेक विविध चित्रपटामध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं. करिश्मा कपूर अनेकदा तिच्या व्यावसायिक जीवनापेक्षा तिच्या वैयक्तिक जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टींमुळे अधिक चर्चेत असते. सध्या करिश्मा कपूर बॉलिवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. करिश्मा कपूर अनेकदा तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपसोबत पार्टी करतानाचे आणि कधीकधी स्वतःचे फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून पोस्ट करत असते. करिश्मा कपूरने प्रेम कैदी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिश्माची गोविंदासोबतची जोडी पडद्यावर सर्वांनाच आवडली होती.

करिश्माप्रमाणेच तिची धाकटी बहीण आणि फॅशन आयकॉन करीना कपूर खाननेही बॉलिवूडमध्ये जबरदस्त छाप पाडली आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या करिश्मा आणि करीना या दोन्ही बहिणी कधीही कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसल्या नाहीत.असे का? याचा खुलासा करिश्मा आणि करीना कपूर यांनी स्वतःच्याच एका मुलाखतीत केला.
करीना कपूर खानने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की तिला नेहमीच तिच्या मोठ्या बहिणीसोबत चित्रपटांमध्ये काम करायचे होते, परंतु तिला अशी कोणतीही चांगली स्क्रिप्ट सापडली नाही ज्यावर दोघे एकत्र काम करू शकतील. करीना म्हणाली की कोणीतरी एक चांगली स्क्रिप्ट घेऊन यावे, ज्याचा आम्ही दोघी बहिणी विचार करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, करीना आणि करिश्मा कपूर यांना ‘जुबैदा’ चित्रपटाचा सिक्वेल ऑफर करण्यात आला होता.

करीनाशिवाय स्वतः करिश्मा कपूरलाही मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की तिने आजपर्यंत करीनासोबत एकही चित्रपट का केला नाही? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली की मला करीनासोबत अनेक चित्रपटांची ऑफर आली होती, पण मला वाटते की आम्ही दोघी बहिणींनी एका चित्रपटात सहकलाकार असणे ही खूप मोठी गोष्ट असेल. आम्हाला असा कोणताही ही चित्रपट करायचा नाही. कोणत्याही चित्रपटासाठी अंतिम असणे महत्त्वाचे असते.