कमाईच्या बाबतीत सर्वांवर भारी पडले अक्षय कुमार, या चित्रपटासाठी घेणार आतापर्यंतची सर्वात महागडी फी !

अक्षय कुमार हा बॉलिवूडचा असा अभिनेता आहे ज्याला सर्व वयोगटातील प्रेक्षक पसंत करतात. प्रत्येक वेळी तो आपल्या चित्रपटांद्वारे लोकांना आश्चर्यचकित करत असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची संकल्पनाच वेगळी असते आणि तो नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न चित्रपटाच्यामार्फत करतो. नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाने भरपूर कमाई केली आहे. अक्षयचा हा चित्रपट हिट ठरल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद आहे. त्याच वेळी, फोर्ब्सने अक्षयला जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये चौथ्या स्थानावर आणले होते. या यादीत अक्षय हा एकमेव भारतीय होता ज्यांना पहिल्या दहामध्ये स्थान मिळालं आहे.
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील असा अभिनेता आहे जो अधिकाधिक चित्रपट करण्यासाठी प्रसिध्द आहे. तो एका वर्षात सहजपणे ३-४ चित्रपट करू शकतो. आजकाल अक्षय कुमार रोहित शेट्टी यांच्या ‘सूर्यवंशी’ या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत कतरिना कैफ काम करत आहे. त्याचबरोबर ही बातमी जोरात सुरू आहे की निर्माता-दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी अक्षय कुमारला साइन केले आहे. सारा अली खान आणि धनुषसुद्धा या चित्रपटात काम करु शकणार आहेत. अक्षय कुमारनेही एका मागोमाग एक हिट चित्रपट देऊन आपली फी वाढवली आहे. आम्ही सांगू इच्छितो कि, त्याच्या कोणत्याही चित्रपटाचे बजेट १०० कोटींपेक्षा कमी नसते. अशा परिस्थितीत अक्षयने आनंद एल राय यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी मोठ्या मानधनाची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. जरी अद्याप या वृत्ताची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही, परंतु जर ती खरी असेल तर ही अक्षय कुमारची सर्वात महाग फी असू शकते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गेल्या वर्षी अक्षयने सलग चार हिट फिल्म्स दिली होती. सध्या अशी स्थिती आहे की अक्षयच्या मागे निर्माता-दिग्दर्शकाची मोठी रांग लागली आहे आणि ते अक्षयला हवी तेवढी फी देण्यास तयार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, आनंद एल राय यांचा चित्रपट करण्यासाठी अक्षयने १२० कोटींच्या मोठ्या रकमेची मागणी केली आहे.
चित्रपटाची लवकरच घोषणा होईल. आधीच्या बातमीवर विश्वास ठेवला गेला तर चित्रपटाची स्टोरी हि एक लव्हस्टोरी म्हणून सांगितले जात आहे आणि येत्या काही महिन्यांत त्याचे शूटिंग सुरू होईल. कामाबद्दल बोलले तर, सूर्यवंशी व्यतिरिक्त अक्षय कुमार हे लक्ष्मी बॉम्ब आणि बच्चन पांडे या चित्रपटात सुद्धा दिसणार आहेत. तसेच अक्षय पृथ्वीराजच्या बायोपिकमध्येही काम करणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत मिस वर्ल्ड झालेल्या मानुषी छिल्लर दिसणार आहेत. नुकतीच लक्ष्मी बॉम्बचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जे प्रेक्षकांना खूप आवडले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की यावर्षीही अक्षय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.
अक्षयने गेल्याकाही वर्षात टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन , एअरलिफ्ट, गुड न्युज सारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. त्याच बरोबर या चित्रपटाची कमाई पण भरघोस होती. तसेच या व्यतिरिक्त अक्षय आपल्याला अनेक सामाजिक जाहिरातीत झळकताना दिसतो.हल्ली त्याची सॅनिटरी पॅड संबधित जागरूकता असलेली जाहिरात अनेक चित्रपट गृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी पाहायला मिळते.