या ५ गोष्टी कधीही इतरांना सांगू नका .. त्याचा त्रास तुम्हालाच होईल !

कोणतीही व्यक्ती आपले जीवन एकट्याने घालवू शकत नाही. प्रत्येकाला जीवनात अशा एका व्यक्तीची गरज असते ज्याच्यासोबत तो आपले सुखदुःख वाटू शकतो, आपल्या मनातील गोष्टी शेअर करू शकतो, मनमोकळेपणाने गप्पा मारू शकतो मग ती व्यक्ती त्याचे आई-वडील असू शकतात, जीवनसाथी किंवा मित्रपरिवार. परंतु तुम्हाला माहित आहे का जीवनातील अशा काही गोष्टी आहेत त्या दुसऱ्यां सोबत शेअर करू नयेत. जीवनात सफलता मिळवायची असल्यास या काही गोष्टी दुसऱ्यांना सांगू नये.आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे अशा काही पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या कधीच दुसऱ्यांसोबत शेअर करू नये.

गुरुमंत्र – जर तुमच्या गुरूंनी तुम्हाला एखादा मंत्र दिला असेल तर तो तुमच्या पर्यंतच ठेवावा. असे अनेक लोक असतात जे त्यांना गुरूंनी दिलेला मंत्र किंवा शिकवण दुसऱ्यांना सांगतात. परंतु असे अजिबात करू नये. जर तुम्ही तुमच्या गुरूंनी दिलेला मंत्र तुमच्या पुरताच मर्यादित ठेवलात किंवा गुप्ता ठेवलात तरच तुम्हाला त्या मंत्रमुळेचा फरक जाणवेल. आणि तो सिध्द होईल.
दान – गुप्तदानाच महत्व शास्त्रामध्ये सविस्तर सांगितले आहे. काही लोक दान केल्यावर ते गावभर करतात. परंतु दान तेव्हाच सफल होते जेव्हा ते गुप्त प्रकारे केले जाते. तज्ञांचे असे म्हणणे आहे की अक्षय पुण्य आणि देवी-देवतांचे आशीर्वाद तेव्हाच लाभतात जेव्हा लोक गुप्तपणे दान करतात. सांगून केलेल्या दानामुळे कधीही पुण्य मिळत नाही.
नवरा बायको मधील संवाद – पती-पत्नीमध्ये जर प्रेम असेल तर त्यांच्यात खटके उडणे हे स्वाभाविक आहे. ज्याप्रमाणे पती-पत्नी त्यांच्या प्रेमात तिसऱ्या कोणाला आणत नाही त्याचप्रमाणे भांडणात सुद्धा तिसर्‍या व्यक्तीला मध्ये घेऊन नये. काही लोक पती-पत्नी मधील भांडणे सोडवण्याऐवजी त्याचा फायदा उचलतात आणि पती-पत्नीमध्ये अजून दुरावा निर्माण होतो. त्यामुळे दोघांमध्ये होणारे वाद हे आपापसातच सोडवावेत.
वय – काही लोकांना सवय असते. ते दुसऱ्यांना स्वतःचे खरे वय सांगत नाहीत. स्वतःला दुसऱ्या पेक्षा तरुण भासवण्यासाठी समोरच्याला काही वेळेस खोटे वय सांगतात. परंतु शास्त्रानुसार असे करू नये. जे लोक वय खोटे सांगत फिरतात त्यांची उर्जा उत्साह कमी होतो. याउलट जे वयाच्या बाबतीत खरे सांगतात त्यांच्या ऊर्जा व उत्साह कधीही कमी होत नाही.
औषधे – काही लोक छोटा मोठा आजार झाला तरीही संपूर्ण गाव भर करतात आणि सर्वांना माहित पडते की ती व्यक्ती कोणती औषधे घेत आहे. परंतु हे चुकीचे आहे. त्याचा लोक गैरफायदा घेतात आणि गावभर चर्चा करत फिरतात.