शाहरुख खान, अमीर खान यांनी तानाजी चित्रपटाबद्दल दिली ही प्रतिक्रीया !

नुकताच प्रदर्शित झालेला अजय देवगनचा तानाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १४.५ करोड रुपये इतकी कमाई केली. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाप्रती प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. मीडियाने देखील या चित्रपटाला चांगली रेटिंग दिली आहे. एवढ्या सगळे प्रतिक्रिया मिळत असताना बॉलीवूड कलाकार कसे मागे राहतील. चला तर मग जाणून घेऊ बॉलिवूड कलाकारांनी या चित्रपटासाठी कोणत्या प्रतिक्रिया दिल्या.
तानाजी चित्रपट बघितल्यावर क्रिटीक एक्सपोर्ट तरण आदर्श यांनी सांगितले की हा एकदम जबरदस्त चित्रपट आहे. त्याने या चित्रपटाला ५ पैकी ४ स्टार दिले आहेत. हा चित्रपट खरच खूप चांगला असून त्यात अजय देवगण चा अभिनय तर कमाल आहेच शिवाय सैफ अली खान ची खलनायकी भूमिका देखील लक्षात राहणारी आहे.
सोहेलने सांगितले की या चित्रपटाचे दिग्दर्शन व‌ सिनेमाटोग्राफी खूपच छान आहे. या व्यतिरिक्त अक्षय कुमार, शाहरुख खान व अमीर खानने या अजय देवगण चे खूप कौतुक केले आहे. असा चित्रपट सारखे बघायला भेटत नाहीत.  या चित्रपटात सर्व गोष्टी अप्रतिम आहेत त्यामध्ये मुख्यतः एक्टिंग, म्यूजिक, आणि दिग्दर्शन !

चित्रपटाचे संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच बाबतीत हा चित्रपट उजवा ठरतो अशी प्रतिक्रिया या बड्या स्टार्सनी दिली. तसेच तनिषा मुखर्जी ने तिच्या ट्विटर अकाऊंट वरुन या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. हा चित्रपट खूपच उत्कृष्ट असून या चित्रपटातील कलाकारांनी ती पत्रे जिवंत केल्याचा भास होतो असे तनिषा बोली. तर सिद्धार्थ मल्होत्रा ने हा फुल पैसा वसूल चित्रपट असल्याचे सांगितले आहे.
अजय देवगण ने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरुन लहान मुलांचे काही फोटो शेअर केले ज्यात शाळेतील शिक्षक मुलांना आपला इतिहास कसा होता हे मोठ्या पडद्या वर दाखवायला घेऊन आलेले. शिवाय लहान मुलांनी देखील स्वतच्या हाताने या चित्रपटातील पात्रांचे चित्र रेखाटले होते.
या चित्रपटाला सगळीकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघता भविष्यात हा चित्रपट किती करोडोंची मजल गाठेल याचे गणित आता बांधता येणार नाही.