बॉलीवूड कलाकारांबद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !

भारतीय चित्रपट’ ही जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते अस आपण म्हणालो तरी यात कोणतीही अतिशोयोक्ती नाही. वार्षिक चित्रपट निर्मितीचा विचार करता १९८६ इतके सिनेमा २०१७ मध्ये निर्माण झाले. फक्त बाॅलीवूडचाच विचार करायचा झाला तर यामधले ३६४ सिनेमा अवघ्या बाॅलीवूड नेच निर्माण केले आहेत. संपुर्ण बॉक्स-ऑफीस महसूलापैकी ४३ टक्के महसूल हा बाॅलीवूड निर्माण करतो, तमिळ आणि तेलुगू चित्रपट ३६ टक्के तर उर्वरित महसूल इतर प्रदेशिक चित्रपट मधून मिळतो.

बाॅलीवूड चे तर आपण सगळेच दिवाने आहोत! येथे काम करणारे सगळेच कलाकार आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच; यातील खुप कलाकारांना आपण फाॅल्लो करत असतो. आणि त्यांचा व्यक्तीगत जीवनाबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न आपण करत असतो, आज आम्ही तुम्हाला यातील काही मोठ्या कलाकारांच्या खाजगी आयुश्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत! नक्कीच वाचा!

1. वहीदा रेहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची प्रेयसी त्याचप्रमाणे त्यांची आई अशा दोनही भुमिका साकारल्या आहेत, त्यांनी अदालत (१९७६) या चित्रपटात त्यांची प्रेयसी तर त्रिशूल (१९७८) या चित्रपटांमध्ये त्यांची आई अशा भुमिका निभावल्या होत्या. वहिदा रेहमान यांनी ‘रेश्मा आणि शेरा’ या चित्रपटात सुनिल दत्त यांच्या प्रेयसी तर अमिताभ बच्चन यांच्या मेव्हणीची भुमिका निभावली आहे.
2.आमिर खान याच्या ‘लगान ‘या चित्रपटामध्ये भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील इतर कोणत्याही चित्रपटांपेक्षा जास्त ब्रिटिश कलाकारानी काम केले आहे. ‘गझनी’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट आहे ज्याने भारतात १०० कोटी चा टप्पा पार केला आणि ‘३ इडीयट’ हा पहिला चित्रपट आहे ज्याने २०० कोटी चा पल्ला पुरा केला.
3. करीना कपूर हिच्या ‘हिराॅइन’ या चित्रपटामध्ये तिने जगभरातील सर्वोत्कृष्ट डिझाइनर्स ने बनवलेले १३० ड्रेस्सेस वापरेल आहेत, भारतीय चित्रपट इतिहासात करीनाचा हा वाॅर्ड्रोब सर्वाधीक महागडया वॉड्रॉबपैकी एक आहे.
4. शाहरुख खान हा दिलवाले दूल्हनीया ले जायेंगे या चित्रपटासाठी पहिली पसंत नव्हता तर सैफ -अली- खान हा या चित्रपटासाठीची पहिली पसंत होता. गमतीची बाब म्हणजे टॉम क्रुज या हॉलीवूड चा कलाकराचा ही या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विचार केला गेला होता.
5. अनिल कपूर ज्यावेळी सर्वप्रथम मुंबई मध्ये आले त्यावेळी ते त्यांचा कुटुंबासोबत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये राहत होते. त्यानंतर अनिल यांनी मुंबई उपनगरात छोटीशी खोली घेतली. अनिल कपूर यांचे आता निवासस्थान जुहू- मुंबई या ठिकाणी आहे.
6. रणवीर सिंग याचे खरे नाव रणवीर सिंग भवनानी असे आहे. त्याने आडनावातील भवनानी हा भाग सोडला कारण त्याचे म्हणणे आहे की एवढे मोठे आडनाव बोलायला अवघड आहे. त्याला सिंग हे आडनाव त्याच्या शिख आजोबांकडून मिळाले आहे.
7. डिंपल या फक्त सोळा वर्षाच्या होत्या ज्यावेळी राज कपूर यांनी त्यांना ‘बॉबी’ या चित्रपटातून इंटरोड्युस केल, डिंपल यांनी सोळाव्या वर्षीच सुपरस्टार राजेश खन्ना यांचाशी विवाह केला आणि त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी चित्रपटातून ब्रेक घेतला.
8. अमिताभ बच्चन वेळेचे एवढे पक्के होते की ते स्वतः खुप वेळा वॉचमन् यायचा आधीच ‘फिल्मिस्थान’ स्टुडिओ चे दरवाजे उघडत असत. अमिताभ बच्चन हे दोन्ही हाताने लिहू शकतात.
9. श्रीदेवी यांचे खरे नाव ‘श्री अम्मा यंगर अय्यप्पन’ असे आहे आणि त्यांनी ‘श्रीदेवी’ हे नाव चित्रपटासाठी घेतले आहे.श्रीदेवी ह्या फक्त १३ वर्षाच्या होत्या जेव्हा त्यानी तमिळ चित्रपटात रजनीकांत यांच्या सावत्र आई ची भुमिका साकारली होती.
10. शाहरूख खान याच्या शाळेतील नावडता विषय हिंदी हा होता, जर त्याची हिंदी त्याने सुधारली तर त्याला हिंदी चित्रपट दाखवण्याचे वचन त्याचा आईने त्याला दिले होते.
11. अवॉर्ड शो च्या इतिहासात फक्त एकदाच ‘बेस्ट अवार्ड फीमेल प्लेबॅक सिंगर’ चे पारितोषिक दोन गायिकांमधे विभागले होते, हे पारितोषिक ‘इला अरुण’ आणि ‘अल्का याग्निक’ यांना खलनायक चित्रपटातील ‘चोली के पीछे’ या गाण्यासाठी देण्यात आला.
12. ह्रितिक रोशन चे खरे आडनाव नागरथ असे आहे, रोशन हे त्याचे खरे आडनाव नाही, ह्रितिक चे टोपणनाव डूग्गु आहे आणि ह्रितिकचा पहिला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ याच्या नावाने सर्वाधिक ९२ पारितोषिक जिंकले होते आणि हा एक गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
माहिती आवडली असल्यास नक्की लाइक करुन शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट करुन कळवा.