गाय-म्हैस चारणारी मुलगी बनली IPS, वाचा तिच्या अदभूत यशाची कहाणी, थक्क व्हाल !

मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही असे म्हटले जाते. तुम्हाला एखादी गोष्ट जर मनापासून हवी असेल आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केलात तर ती गोष्ट तुम्हाला कधी ना कधी नक्की मिळते. मात्र त्यासाठी आम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणत्या सुखा सुविधा मिळाल्या नाहीत असे बहाणे बनवून चालणार नाहीत. एखाद्या गरीब कुटुंबात जन्म घेणे ही त्या व्यक्तीची चूक नसते. मात्र पुढे जाऊन तुमचे मरण सुद्धा गरीबीतच झाले तर मात्र ती तुमची चूक ठरू शकते. कारण कोणतीही गरीब व्यक्ती परिस्थितीवर मात करून गडगंज श्रीमंत बनू शकते याची अनेक उदाहरणे हयात आहेत. अशीच एक महिला जी एकेकाळी गाई-म्हशींना चरायला घेऊन जायची तीच आयपीएस ऑफिसर बनली.

केरळच्या इरोड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारी वनमती आयपीएस ऑफिसर झाली आहे. वनमती एका अविकसित गावातील मुलगी होती. तिचे वडील शेती करून परिवाराचे पोट भरायचे. त्यांचे शेत जास्त नसल्यामुळे घर खर्च पुरेशा प्रमाणात भागायचा नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी शहरात जाऊन टॅक्सी चालवायचा निर्णय घेतला आणि ते शहरात आले. त्या वेळी घरातील छोट्या-मोठ्या खर्चांसाठी त्यांनी काही प्राणी पाळले होते. त्या प्राण्यांना चरायला घेऊन जायची जबाबदारी वनमती वर होती.

वनमती चे बालपण या गाई म्हशींना चरायला घेऊन जाण्यातच संपले. शाळेतून घरी परतल्यावर ती प्राण्यांना चरायला घेऊन जायची. उरलेल्या वेळात अभ्यास करायची. गावातील सरकारी शाळेतून तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. तर पुढे महाविद्यालयीन शिक्षण स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले. त्यानंतर कॉम्प्युटर एप्लीकेशन मध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केले. ते झाल्यावर एका प्रायव्हेट बँकेत नोकरी करू लागली. या नोकरी मध्ये मिळणाऱ्या पगारातून तिचा घर खर्च भागू लागला.

मात्र वनमती ची स्वप्ने थोडी वेगळी आणि मोठी होती. तिला देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाणारी सिविल सर्विस ची एक्झाम क्लिअर करून आयपीएस बनायचे होते. त्यामुळे बँकेतील नोकरी सोबतच सिविल सेवा परीक्षेची तयारी सुद्धा करत होती. त्यासाठी ती तिच्या पगारातील काही पैशांची बचत करायची. पुढे वनमती ची मेहनत फळाला लागली. सिव्हिल सेवा परीक्षेत केवळ पास न होता तिने त्यामध्ये सर्वोत्तम रॅंक सुद्धा मिळवला.

विशेष म्हणजे वनमती पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यशस्वी ठरली. पण २०१५ मध्ये झालेल्या सिव्हील सेवा परीक्षेत १५२ वा रँक मिळवून तिने तिच्या घरच्यांचे सोबत गावचे सुद्धा नाव रोशन केले. वनमती आयपीएस झाल्याच्या बातमीवर गावात कोणाला विश्वास बसत नव्हता. एक सर्वसाधारण घरातील गाई म्हशींना चरायला नेणारी मुलगी आयपीएस कशी बनू शकते असेच सुरुवातीला सगळ्यांना वाटत होते. वनामती ची ही सफलता गावातील इतर मुलींना प्रेरणादायी ठरली आहे. आता त्या गावातील प्रत्येक जण मोठे स्वप्न पाहू लागला आहे. जोपर्यंत तुम्ही मोठी स्वप्न पाहत नाही तोपर्यंत ती पूर्ण देखील होत नाही. त्यामुळे सुरुवात तिथूनच करा.

आज वनमती तिच्या मेहनत, चिकाटी, धैर्य आणि स्वबळावर आयपीएस ऑफिसर बनली आहे. तिच्या या यशाला सलाम! वनमतीची प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच काही तरी करण्याचा प्रयत्न करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !