भाज्यांमुळे कोरोनाव्हायरस चा शिरकाव घरामध्ये होऊ शकतो का ? जाणून घ्या !

हल्ली दिवसेंदिवस कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढतच चाललेला दिसतो. कोरोनाव्हायरस ची लागण कधी कुठून कशी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची योग्यरीत्या काळजी घेणे गरजेचे आहे. देशातील काही शहरे हे भाजी मंडई किंवा भाजीवाल्यांशी जोडले आहेत. अशातच भाजी च्या माध्यमातून कोरोना घरात घुसणार तर नाही ना अशी शंका लोकांच्या मनात येऊ लागली आहे.
त्यामुळे लोक खूप सावधगिरी बाळगताना दिसतात. विशेष तज्ञाचे म्हणणे आहे की अशा काळात घाबरण्याची नाहीतर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. डबुआ कॉलनी आणि सेक्टर १६ मधील भाजी मंडई शी निगडीत लोकांमध्ये झालेल्या कोरोना संक्रमणामुळे प्रशासनाने या दोन्ही भाजी मंडई बंद केल्या होत्या. आतापर्यंत येथे अनेक लोकांना कोरोना संक्रमण झाले असून यातील काही लोक भाजी मंडईतील सुद्धा आहेत.

लोकांमध्ये भाजीच्या माध्यमातून कोरोना घरात शिरू शकतो अशी भीती वाढू लागली आहे. सर्वोदय हॉस्पिटल मधील आहार विशेषज्ञ निदा खान यांनी सांगितले की, सध्या बाजारातून भाजी खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये चिंता वाढू लागली आहे. तसेच आता भाज्या खरेदी कशा कराव्यात हा प्रश्नसुद्धा लोकांना सतावू लागला आहे. त्यांनी सांगितले की भाज्यांना कोरोनाव्हायरस च्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून कोरोनाव्हायरस पासून तुमचे रक्षण होऊ शकते. निदा खान यांनी सांगितले की कोरोनाव्हायरसला घाबरण्याची नाही तर त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.
भाज्यांमधून कधीच व्हायरस येत नाही. गर्दीत असलेल्या संक्रमित व्यक्तीमुळे कोरोनाव्हायरसचे संक्रमण तुमच्या घरात येऊ शकते. निदा यांनी सांगितले की भाजी घरी आणताना थोडी सावधानी बाळगली पाहिजे. बाजारात जाते वेळी हाताला सॅनिटायझर लावून त्यावर ग्लव्हज् घालून जा. भाजी आणताना त्या कापडाच्या पिशवी मधून आणाव्यात. पिशवी ला हात न लावता भाजीवाल्याकडून त्या भाज्या सरळ पिशवीत घालाव्यात. त्यानंतर घरी आल्यावर भाज्या बाहेर काढून त्यांना गरम पाण्यात थोडे मीठ घालून धुऊन घ्या. व्हायरसमुळे होणाऱ्या संक्रमणापासून वाचण्यासाठी संतुलित आहार घ्यावा.
निदा खान यांनी सांगितले की, फळ आणि भाज्या धुण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. भाज्या आणि फळांना सर्वप्रथम गरम पाण्यात थोडे मीठ घालून धुवावे. मिठाऐवजी थोड्या बेकिंग सोड्याचा उपयोग सुद्धा करू शकता. सालीसकट खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांना एक तास पाण्यात भिजवून ठेवा. भाज्या चांगल्या असल्यास त्यांना काही वेळासाठी उन्हात ठेवून द्या. त्यानंतर एका दिवसाने ती भाजी बनवा. भाजी धुण्या आधी आणि धुतल्यानंतर स्वतःचे हात साबणाने स्वच्छ धुवा.