या वेळी ग्रीन टी प्याल तर होऊ शकते असे नुकसान !

लोक नेहमी ग्रीन टी पिण्याचे फायदे सांगतात मात्र ही ग्रीन टी चुकीच्या वेळेस प्यायल्यास शरीरास नुकसान सुद्धा होऊ शकते. हो हे खरे आहे ग्रीन की चुकीच्या वेळेस प्यायल्यास शरीरास हानी पोहोचू शकते. खरे तर ग्रीन टी मध्ये फ्लेवोनाइडचे प्रमाण अधिक असते. हे फ्लेवोनाइड शरीरातील सूज कमी करण्यास तसेच शरीरात असलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास आणि हृदयविकार यांसारखे धोके कमी करण्यास मदत करते.
लोक नेहमी स्वतःला फिट ठेवण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करतात. मात्र स्वतःला फिट ठेवण्यासाठी कधीही कोणत्याही वेळी ग्रीन टी चे सेवन करणे चुकीचे आहे. रात्रीच्या वेळेस ग्रीन टी प्यायल्याने तुम्हाला गाढ झोप लागू शकते. ती झोप इतकी गाढ असते की डोळ्यावरून उतरत नाही. त्यामुळे तुमचा पुढील दिवस खराब जाण्याची शक्यता असते.
ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती ?
ग्रीन टी पिण्यासाठी सकाळचा वेळ हा सर्वोत्तम! कारण ग्रीन टी मध्ये असलेले थिनिन कोर्टीसोल हे तणावा संबंधी हार्मोन्सला कमी करण्यास मदत करतात. ते शरीरात गेल्यावर डोक्यातील न्युरोन गतिविधिस आराम देतात. ग्रीन टी मध्ये कॉफीच्या तुलनेत कॅफिनचे प्रमाण कमी असते. नुकत्याच झालेल्या एका संशोधानात असे दिसून आले की सकाळी ग्रीन टी पियाल्यामुळे रात्री झोप खूप चांगली लागते.
म्हणून शरीराला फिट ठेवण्यासाठी सकाळी किंवा दुपारी एक/ दोन कप ग्रीन टी प्यावी. हे शरीराला पोषक आणि फायदेशीर असते. जर तुम्हाला रात्रीची ग्रीन टी पिण्याची सवय असल्यास ती झोपण्या आधी २ तास प्यावी तर हानिकारक होत नाही.