फक्त या कारणामुळे नवरा-नवरीला लग्नामध्ये हळद चोळतात, तुम्हालाही नक्कीच माहित नसेल !

हिंदु धर्मातील लग्न म्हटलं की नाना विविध प्रथा परंपरा येतात. प्रत्येक गावानुसार, प्रत्येक राज्यानुसार येथील प्रथा पंरपरा बदलत असतात. लग्न हा दोन जीवांचा नाही तर दोन कुटुंबांचा एकत्र येण्याचा सोहळा असतो. त्यामुळे त्या सोहळ्यात कोणतीही उणीव भासु नये याची प्रत्येकजण अटोकाट काळजी घेत असतं. लग्नातील प्रत्येक रितीभाती या वेळेत आणि योग्य पद्धतीने पुर्ण करण्यावर प्रत्येकाचा कल असतो. तो सोहळा , ते दिवसल कायमस्वरुपी आठवणीत ठेवण्यासाठी जो तो धडपड करत असतो. पण मंडळी या रितीभाती नुसत्याच आठवणीत ठेवण्यापुरत्या नसतात तर त्या पाठी काही ठोस कारणे सुद्धा असतात.

या सर्वांमधीलच एक प्रथा म्हणजे हळद लावणे. नवरा नवरीला हळदीचा लेप लावल्याने अनेक फायदे होतात. त्यामुळे हळदीच्या दिवशी हळकुंड कुटुन किंवा तयार हळदी पावडरमध्ये चंदन, बेसन, आणि काही सुगंधीत तेलांचा वापर करुन हळद तयार केली जाते. ती हळद त्वचा तजेलदार बनवण्याचे काम करते. लग्नाच्या आधी केली जाणारी ही पद्धत फारच रंजक असते. जी नवरा नवरीचा चेहरा उजळवण्यास मदत करते. त्याचे अन्य काही फायदे सुद्धा आहेत जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्वचेसंबधी आजार दुर करण्यासाठी हळदीचा वापर करावा असे खुद्द आयुर्वेदामध्ये नमुद केले आहे. ही एक औषधी वनस्पती आहे जिचा वापर त्वचेसंबधी आजार दूर करण्यासाठी केला जातो. जेणेकरुन लग्नावेळी नवरा नवरीला कोणतेही इन्फेक्शन होऊ नये. हळदीमध्ये अनेक औषधी गुण सुद्धा असतात. ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग असतात त्यांनी चेहऱ्याला हळद लावल्यास ते काळे डाग दूर होण्यास मदत होते.

लग्नात चेहरा नैसर्गिकरित्या चमकावा यासाठी लग्ना आधी एक किंवा दोन दिवस हळद लावण्याची पद्धत असते. मानवी त्वचेचा संबंध सुर्यप्रकाशासोबत आला की अनेकांना सनटॅन ही समस्या भेडसावत असते. ती समस्या दूर करायची असेल तर हळदीचा वा्पर करावा.

लग्नाच्या आधीची धावपळ, टेन्शन, रात्रीचे जागरण, किंवा शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे डोळ्यांखाली डार्कसर्कल येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील तेज निघुन जाते. ही समस्या दूर करण्यासाठी हळदीचा लेप लावणे फार उत्तम ठरते. लग्नावेळी घरातील निगेटीव्ह एनर्जी दूर राहावी तसेच नवरा नवरी त्या नकारात्मक शक्तीपासुन दुर राहावी यासाठी त्यांना हळद लावली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !