सा रे ग म प लिटील चॅम्प्स विजेती ‘कार्तिकी गायकवाड’ लवकरच अडकणार विवाह बंधनात ! 

पूर्वी झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स हा संगीत रियालिटी शो कुटुंबातील सर्वजण एकत्र मिळून पाहायचे. या या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक सर्वांना स्वतःच्या घरांमधीलच एकजण आहे असेच वाटायचे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमात आर्या आंबेकर, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे हे स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते मात्र यामधून पहिली येण्याची बाजी मारली ती म्हणजे कार्तिकी गायकवाडने. कार्तिकी बद्दल विशेष सांगायचे झाल्यास या स्पर्धेच्या मध्यंतरी ती कमी गुण मिळाल्यामुळे एलिमिनेट झाली होती मात्र कॉल बॅक राउंड मध्ये दमदार पुनरागमन करून तिने या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले होते.
कार्तिकी ने गवळण, भजन, किर्तन, भक्तीगीते यांसारख्या वेगवेगळ्या संगीत प्रकारातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यावेळी घागर घेऊन… घागर घेऊन हे तिचे गाणे विशेष गाजले. या गाण्याची गायिका म्हणून तिला त्याकाळी खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर कार्तिकीने अनेक गाणी गायली.
नुकताच कार्तिकीचा पाहण्याचा कार्यक्रम तिच्या राहत्या घरी पार पडला. कार्तिकीच्या होणाऱ्या पतीचे नाव ‘रोनित पिसे’ असे असून तो इंजिनियर आहे तसेच त्याचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा आहे. कार्तिकी चे वडील कल्याणजी गायकवाड आणि रोनितचे वडील जुने मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी आपापसात आमचे लग्न ठरवले असे कार्तिकीने सांगितले. कार्तिकी व रोनितचा २६ जुलैला साखरपुडा असून लग्नाची तारीख मात्र अजून ठरलेली नाही.

सध्या सोशल मीडियावर कार्तिकी व तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे फोटो खूप व्हायरल आहे. ही गोड बातमी समजल्यावर कार्तिकीच्या चाहात्यांनी तिच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्तिकी बद्दल बोलायचे झाल्यास तिचा जन्म आळंदी येथील एका वारकरी संप्रदाय असलेल्या परिवारात झाला. रोनितला देखील संगिताची आवड आहे. तो फार छान तबला वाजवतो. इथून पुढे ते दोघे संगीताची आराधना सुरू सुरु ठेवणार आहेत.
कार्तिकीला लहानपणापासूनच तिच्या वडिलांनी संगीताचे शिक्षण दिले. तिचे वडील स्वतः एक गायक व म्युझिक कंपोजर आहेत. कार्तिकीने २००८ मध्ये वयाच्या ९ व्या वर्षी सा रे ग म प लिटिल चेंस विजेतेपद पटकावले होते. २०१२ मध्ये तिचा दिनांचा सोयरा पांडुरंग हा पहिला अल्बम रिलीज झाला.