अक्षयकुमार ची मुलगी बनली मेकअप आर्टिस्ट, आई ट्विंकल खन्ना चा केला मेकओवर !

लॉक डाऊन मुळे सध्या सर्व बॉलीवूड कलाकार आपापल्या घरात त्यांच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. याच कारणांमुळे सध्या सोशल मीडियावर कलाकारांची रेलचेल वाढली आहे. काही कलाकार त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या करीत आहेत तर काही आपले वेगवेगळे फोटो पोस्ट करून त्यांच्या फॅन्सी सोबत जोडून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. अभिनेता अक्षय कुमार च्या सात वर्षाच्या मुलीला घेऊन लोक नेहमीच उत्सुक असतात. अक्षय च्या मुलीचे नाव नितारा असे आहे. ती नेहमीच वेगवेगळे कारनामे करत असते. याबद्दलच्या पोस्ट तिचे आई-बाबा म्हणजेच अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर शेअर करत असतात.
नुकतेच अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती एका वेगळ्या नवीन लुक मध्ये दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर खूप मेकअप सुद्धा दिसत आहे. या फोटोमध्ये तिचे गाल खूप लाल झाले आहेत. तर सोबतच आयब्रो खूप गडद दिसत आहेत.
हा फोटो शेअर करत ट्विंकलने सांगितले की तिचा हा मेकअप त्यांची मुलगी निताराने केला आहे. ट्विंकलने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, माझ्या लहानगीने माझा मस्त मेकओवर केला आहे. त्यासोबतच ट्विंकल ने मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनीला सुद्धा हा फोटो टॅग करून लिहिले आहे की, हे बघ तुला आता बरोबरी ची टक्कर मिळणार आहे.
ट्विंकल च्या मेकओवरच्या फोटोवर अभिनेता आयुष्मान खुराना ची पत्नी ताहिरा कश्यपने कमेंट करून म्हटले की हीच खरी मजा आहे! मुलांसाठी सर्वात उत्कृष्ट कॅनवास हा चेहराच असतो. तर ताहिराला प्रत्युत्तर देताना ट्विंकले लिहिले की, या गरीब कॅनव्हास ची हत्या केली जात आहे. या फोटोवर ताहिरा सोबतच संदीप खोसला, सोनाली बेंद्रे ने सुद्धा विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे दोघे त्यांची मुलं आरव आणि मुलगी निताराला नेहमीच मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडिया वरून कधीतरीच हे दोघे त्यांच्या मुलांसोबत चा फोटो शेअर करतात. अक्षयला जेव्हा केव्हा वेळ असतो तेव्हा तो घरी राहून त्याच्या मुलांसोबत मस्ती करण्यात घालवतो.