अजय देवगण सोबत काम करण्याच्या उत्सुकतेपोटी संस्कारी रुपात सेट वर पोहचली ही अभिनेत्री !

बॉलिवूडमध्ये असे खूप अभिनेते आहेत त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री तरसत असतात. या यादीत शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार, ऋतिक रोशन, अमिर खान या अभिनेत्यांचे नाव सहभागी आहे. हे सर्वच अभिनेते त्यांच्या अभिनयामुळे, डान्स मुळे, ऍक्शन सीन मुळे नेहमीच त्यांच्या चाहत्यांची मने जिंकून घेत असतात. याच कारणामुळे अनेक अभिनेत्रींना या अभिनेत्यांसोबत स्क्रीन वर झळकण्याची इच्छा असते. साऊथ कडील इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता सुभाष या वर्षी बॉलिवुड मध्ये पदार्पण करणार आहे. प्रणिताला तिच्या पहिल्याच चित्रपटात बॉलिवुड सुपरस्टार अजय देवगण सोबत काम करण्याची संधी मिळाली.
अजय देवगण च्या या येणाऱ्या नवीन चित्रपटाचे नाव आहे भुज द प्राइड ऑफ इंडिया. या चित्रपटात अजय देवगण सोबत प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसेल. १९७१ साली झालेल्या इंडो – पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. हा एक ऍक्शन पट असेल. या चित्रपटात अजय आणि प्रणिता सुभाष सोबत संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर, नोरा फतेही ही स्टार कास्ट सुद्धा असेल. प्रणिता च्या या पहिल्या वहिल्या बॉलिवुड चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी तिला चित्रपटाच्या लोकेशन वर जाताना पाहिले गेले. असे पाहायला गेल्यास प्रणिताला अनेकदा वेस्टर्न कपड्यांमध्ये पाहिले जाते.
मात्र अजय देवगण च्या चित्रपटाच्या सेट वर ती एकदम संस्कारी बनून गेली होती. भारतीय पेहरावात ती खूप सुंदर दिसत होती. तिच्यातील हा बदल पाहून अंदाज घेऊ शकतो की ती या चित्रपटात काम करण्यासाठी किती उत्सुक आहे.
प्रणिताला सिनेसृष्टीत येऊन १० वर्षे पूर्ण झाली. तिने २०१० मध्ये कन्नड चित्रपट पौरकी मधून तिच्या अभिनयातील करीयरला सुरूवात केली होती. तेव्हा पासून ते आज पर्यंत प्रणिता ने अनेक मोठमोठ्या चित्रपटात काम केले. साऊथ इंडियन चित्रपटात तिची स्वतः ची वेगळी ओळख आहे.