प्रेक्षकांसाठी खुशखबर लॉकडाऊनमुळे पुन्हा प्रसारित केली जाणार श्रीकृष्ण ही मालिका !

कोरोना मुळे संपूर्ण देश ३ मे पर्यंत लॉक डाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घोषित केला त्यामुळे देशातील उद्योगधंद्यासोबत टिव्ही इंडस्ट्री मधील कामे सुद्धा ठप्प झाली. त्यामुळे या काळात टिव्ही वर दाखवायचे काय तर पर्याय म्हणून ८०/९० च्या दशकातील लोकप्रिय मालिका दूरदर्शन वर दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रामायण , महाभारत यासारख्या प्रसिद्ध मालिका पुन्हा सुरू झाल्या.
या दोन मलिकां व्यतिरिक्त अजूनही काही मालिकांचा समावेश यात आहे. या मालिकांची जादू एवढी प्रभावी ठरली की इतक्या वर्षानंतरही यांनी पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडले. या मालिकांना मिळालेला प्रतिसाद पाहता आता श्री कृष्ण ही मालिका सुद्धा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री कृष्ण या मालिकेचे दिग्दर्शक सुद्धा रामानंद सागर हेच होते.
ही बातमी डिडी नॅशनल वाहिनीने ट्विटर वरुन दिली. या ट्विट मध्ये असे लिहिले आहे की आमच्या प्रेक्षकांसाठी अजुन एक आनंदाची बातमी आहे ! ती म्हणजे लवकरच श्री कृष्ण परत येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी रामायण महाभारत मालिकेनंतर श्री कृष्ण मालिका सुद्धा पुन्हा दाखवण्याची मागणी केली होती. आता त्यांची ही मागणी पूर्ण होत आहे.

हे वाचा – आपल्या अभिनयाने रामायण मध्ये लोकांना रडवणारे भरत आज या कारणामुळे नाहीत आपल्या सोबत !

रामानंद आर्ट्स प्रोडक्शन ने तयार केलेली ही मालिका १९९३ मध्ये दूरदर्शनच्या मेट्रो वाहिनीवर प्रसारित व्हायची. त्यानंतर १९९६ मध्ये दूरदर्शन वर प्रसारित होऊ लागली. या मालिकेत श्री कृष्णाची भूमिका सर्वदमन डी. बॅनर्जी यांनी केली होती. या मालिकेमुळे त्यांना खूप प्रसिद्धी सुद्धा मिळाली. लोक त्यांना खरेखुरे कृष्ण समजायला लागले होते. त्यांनी रामायण, अर्जुन, जय गंगा मैया आणि ओम नमः शिवाय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.

हे वाचा – या ६ अभिनेत्यांनी साकारली प्रभू रामाची भूमिका, पण यांची ठरली सर्वांत प्रसिद्ध !

१४ व्या आठवड्याच्या टीआरपी यादीत रामायण मालिकेने बाजी मारली. रामायण मालिकेला प्रेक्षकांनी सर्वाधिक वेळा बघितले त्यामुळे ही मालिका टॉप ची मालिका ठरली. रामायणनंतर दुसरा नंबर लागतो ते म्हणजे महाभारत या मालिकेचा. महाभारत ही मालिका डीडी भारती आणि डीडी रेट्रो या वाहिनीवर प्रसारित केली जाते.
श्री कृष्ण या मालिकेत ३ अभिनेत्यांनी कृष्णाची भूमिका केली होती. बालपणीचा कृष्ण अशोक कुमार यांनी साकारला होता तर तारुण्यातील कृष्ण स्वप्निल जोशी ने केला होता. आणि मोठ्या कृष्णाची भूमिका सर्वदमन डी. बॅनर्जी यांनी केली होती.

हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !