या कारणांमुळे राणी मुखर्जी पडली आदित्य चोपडा यांच्या प्रेमात !

राणी मुखर्जी ही एके काळी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. तसे पाहायला गेले तर तिची प्रसिध्दी अजूनही कमी झालेली नाही. जबरस्त अदाकारी आणि तगड्या अभिनयाने तिने आपल्या प्रेक्षकांचे मन सहज जिंकून घेतले होते. पण आदित्य चोपडा सोबत लग्न झाल्यानंतर तिची गिनती अशा कपल्स मध्ये होऊ लागली जे सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव नसतात.
आदित्य चोपडा आणि राणी मुखर्जी या दोघांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवणेच पसंत केले. हे दोघे एकाच इंडस्ट्रीत काम करतात मात्र त्यांना देखाव्यात नाही तर वैयक्तिक आयुष्य सुखाने जगण्यात महत्त्व वाटते. एका मुलाखतीत राणी मुखर्जी ने सांगितले कि मी इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे पण आदित्य हे एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांना मी मनापासून मान द्यायची.
राणीने सांगितले की इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मान देणे हे खूप कठीण आहे कारण येथे तुम्हाला आतून आणि बाहेरून ओळखले जाते. त्यामुळे अशा लोकांमध्ये आदित्य हे माझ्यासाठी एक आहेत त्यांना मी वास्तवात खूप मान देत आली आणि अजूनही देते. त्यांना मी हा मान त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे दिला. आदित्य चोपडा यांची राणी मुखर्जीला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे आदित्य हे पूर्णपणे एक फॅमिली मॅन आहेत. हीच एक गोष्ट राणीला जास्त भावली त्यामुळेच या दोघांचे एकमेकांसोबत जास्त जमू लागले. कदाचित याच कारणाने हे दोघे सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.
आदित्य आणि राणी यांनी लग्न केल्याची बातमी जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा सर्वच जण अवाक् झाले कारण या दोघांनी गपचुप लग्न केले होते. ज्यावेळी या दोघांनी लग्न केल्याची वार्ता पसरली त्यावेळी केवळ त्यांचे फॅन्स च नाही तर बॉलिवुड मधील अनेक कलाकार सुद्धा हैराण झाले. आता या दोघांच्या लग्नाला ६ वर्षे होतील. तसे पाहायला गेल्यास या दोघांच्या अफेयर च्या चर्चा आधीपासूनच सुरू होत्या. पण तरीही जेव्हा त्यांनी गुप्तता राखून लग्न केले तेव्हा त्यांचे फॅन्स हैराण झाले. या दोघांनी इटली ला लग्न केले होते त्यावेळी यांच्या लग्नात केवळ १२ लोकच साक्षी होते.
संपन्न रेसटॉरंट्स मध्ये आदित्य चोपडा आणि राणी मुखर्जी यांची पहिली भेट झाली होती. त्यावेळी तेथे यशराज बॅनरच्या दिलवाले दुल्हानिया लें जायेंगे या चित्रपटाने जे यश संपादन केले होते त्याबद्दल पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत आदित्यला भेटण्यासाठी राणी खूप उत्सुक होती. त्यानंतर करण जोहर ला प्रभावित होऊन आदित्य यांनी त्यांचा पुढील चित्रपट कुछ कुछ होता है मध्ये राणी ला घेण्याची इच्छा व्यक्त केली कारण राणी च्या आधीच्या चित्रपटातील तिचा अभिनय पाहून ते खूप प्रभावित झाले होते.
मीडिया मध्ये अशा बातम्या येत होत्या की जेव्हापासून आदित्य आणि राणी यांच्यातील जवळीक वाढली होती तेव्हापासून आदित्य यांच्या आधीच्या वैवाहिक आयुष्यात तडे जाऊ लागले होते. त्यानंतर २००९ मध्ये आदित्यने त्यांची पहिली पत्नी पायल खन्ना ला घटस्फोट दिला. पण राणी मुखर्जीने या सर्व अफवा असल्याचे सांगितले. राणी चे म्हणणे आहे की त्यांच्या घटस्पोटा नंतर आमची मैत्री झाली होती. आता राणी व आदित्यला एक मुलगी असून तिचे नाव अदिरा आहे. हे दोघेही तिला मीडिया पासून नेहमी दूर ठेवतात.