या मुलीने साकारली होती श्री कृष्णा ची भूमिका, जाणून घ्या आता ती मुलगी काय करते !

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला. त्यामुळे सर्वच मालिकांच्या चित्रीकरणाला स्थगिती आली. यामुळेच प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी टीव्हीवर ८० आणि ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध मालिका महाभारत आणि रामायण दाखवण्यात आल्या. या सिरीयल नंतर जय श्री कृष्णा ही मालिका सदा रिटेलिकास्ट केली जाणार आहे.
यामुळेच या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या कलाकारांना पैकीच धृती भाटियाने जयश्रीकृष्णा या मालिकेत कृष्णाच्या बालपणीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना ही बातमी वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल परंतु बाल कृष्णाची भूमिका कोणा मुलाने नव्हे तर एका मुलीने साकारली होती. या मालिकेत स्वतःच्या गोड आणि निरागस हास्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी धृती भाटिया आता खूप मोठी झाली आहे. तिच्या नावाचे एक इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आहे.
पण हे तिचे ऑफिशियल अकाउंट आहे की नाही हे सांगणे थोडे मुश्कील आहे. पण या अकाउंटवर धृतीचे खूप सारे फोटो आहेत. ह्या फोटो मध्ये ती खूप सुंदर दिसते. ज्यावेळी धृतीने कृष्णाची भूमिका साकारली होती त्यावेळी ती केवळ तीन वर्षांची होती. या मालिकेनंतर धृतीने इस प्यार को क्या नाम दु, माता की चौकी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली होती. तिचे वडील एक बिझनेस मॅन आहेत. धृती आता 14 वर्षांची झाली असून सध्या ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करीत आहे. धृतीचे वडील एक बिझनेस मॅन आहेत तर आई कोरिओग्राफर आहे. धृती सुद्धा तिच्या आईप्रमाणे डान्स कोरिओग्राफर बनू इच्छिते. यासाठी खूप काळापासून क्लासिकल डान्स शिकत आहे.
सागर आर्ट्स ने नव्या पिढीसाठी २००८ मध्ये जय श्री कृष्णा ही मालिका बनवली.१९९३ मध्ये सुपरहिट झालेल्या रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण या मालिकेचा रिमेक रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर ने बनवला. ही मालिका जुलै २००८ मध्‍ये प्रसारीत झाली होती. सागर आर्ट्स या बॅनरखाली तयार झालेल्या या मालिकेत अनेक कलाकारांनी काम केले. आता ही मालिका पुन्हा एकदा कलर्स वाहिनीवर टेलिकास्ट केली जाणार आहे.