… आणि म्हणून हॉटेल्समध्ये 420 क्रमांकाची रुम नसते

आपल्यापैकी अनेकजण प्रवासा दरम्यान हॉटेलमध्ये थांबतात.या दरम्यान हॉटेलतर्फे रुमचा नंबर आणि त्याच्याशी संबंधित इतर काही गोष्टीही दिल्या जातात. देश-विदेशात असे अनेक हॉटेल्स आहेत ज्यांच्यामध्ये शेकडो रुम्स असतात. हे रुम्सला 1 नंबरपासून शेवटच्या नंबरपर्यंतचे नंबर्स दिलेले असतात. मात्र, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अनेक हॉटेल्समधील रुम्सला 420 क्रमांकाचा रुम उपलब्ध नसतो.तुम्ही आतापर्यंत ज्या हॉटेलमध्ये थांबले आहात त्या हॉटेलमध्ये 420 क्रमांकाचा रुम उपलब्ध नसेल आणि कदाचित तुमच्या हे लक्षातही आलं नसेल. पण अनेक हॉटेल्समध्ये या क्रमांकाचा रुम उपलब्ध नसतो. यामागे अनेक कारणं असल्याचं समोर आलं आहे, प्रत्येकजण आपल्याला जे माहिती आहे किंवा जे पटतं ते कारण सांगत असतो. पाहूयात काय आहेत या मागची कारण…भारतात कायद्यानुसार भारतीय दंड विधाननुसार, फसवणुकीच्या प्रकरणात कलम 420 नुसार शिक्षा ठोठावण्यात येते.
420 क्रमांक वापरणं अशुभ असतं असे अनेकजण मानतात त्यामुळे या क्रमांकापासून ते लांबच राहतातपरदेशांमधील अनेक हॉटेल्समध्ये 420 क्रमांकाचा रुम उपलब्ध नसतो. या ठिकाणी अंधविश्वास किंवा कुठलाही कायदा नाहीये. मात्र, 20 एप्रिलशी संबंधित हे प्रकरण आहे. या तारखेला अनेक देशांमधील नागरिक हे अफिमचं सेवन करुन देश विरोधी नारे देतात आणि ही लोक संध्याकाळी 4.20 मिनिटांनी सरकारच्या त्या निर्णयाचा विरोध करतात ज्यामध्ये अफिम, भंग यावर बंदी घालण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी हॉटेल्समध्ये 420 क्रमांकाचे रुम्स असत मात्र, कपल्स हा रुम बुक करत अश्लील चाळे करत असत. जोडप्यांच्या या कृत्याला कंटाळून हॉटेल मालकांनी 420 या क्रमांकाच्या रुमवर बंदी घातली आणि त्यानंतर हळूहळू हा रुमच बंद करण्यात आला.