महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार अभिनेता ‘रितेश देशमुख’ बद्दल हि गोष्ट नक्कीच तुम्हाला माहित नसेल ..

बॉलिवूड स्टार्स आपल्या कामात इतके व्यग्र असतात की, त्यांना रोजचे वृत्तपत्र वाचायलाही वेळ नसतो, असा एक आरोप नेहमीच केला जातो. मात्र, अभिनेता रितेश देशमूख याने हो आरोप साफ खोडून काढला आहे. रितेश देशमुख हा दररोज कमीत कमी एक डझन म्हणजे १२ वृत्तपत्रांचे वाचन करतो. अपवाद वगळता आपल्या दिवसाची सुरूवात रितेश वृत्तपत्रवाचनानेच करतो.
ऐकून कदाचीत नवल वाटले असेल. परंतू, रितेशने स्वत:च ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली आहे. रितेश म्हणाला की, तो दररोज १२ वृत्तपत्रे वाचतो.

https://static.toiimg.com/photo/54498279.cms
त्याचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख दररोज २० वृत्तपत्रे वाचत असत. रितेशला वाचनाचा वारसा विलासरावांकडूनच मिळाला आहे. विलासराव देशमुख यांचे वक्तृत्वही फर्डे होते.
https://dc-cdn.s3-ap-southeast-1.amazonaws.com/dc-Cover-951u7i5r2kd51ug1j8q4csrat5-20160523231231.Medi.jpeg

रितेशने सांगितले की, सर्वात जास्त मजा बातम्यांची हेडिंग वाचताना येते. तसेच, जर एखादा चांगला लेख छापून आल्यास तो लेख पूर्ण वाचतो. मी केवळ राजकारणावरील बातम्याच वाचतो असे नव्हे, तर मी हेही पहात असतो की, सध्या काय चालले आहे. मला सर्वच विषयावरील बातम्या वाचायला आवडते. विशेष म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पूर्ण वृत्तपत्र वाचत असल्याचेही रितेशने या वेळी सांगितले.
हे सर्व पेपर वाचण्यास मला ४५ ते ६० मिनीटे इतका अवधी लागतो असेही, रितेश सांगतो. ही सगळी वृत्तपत्रे माझ्या घरी असतातच. परंतू, जर मी घराबाहेर असेल, किंवा शूटींगवर असेल तर ही वृत्तपत्रे माझ्या कारमध्येही ठेवलेली असतात. जी मी सीटवर बसून प्रवास करता करता वाचत असतो, असेही रितेशने सांगीतले.