‘आय लव्ह यू’ म्हणण्यापेक्षाही प्रभावी आहेत ही काही खास वाक्ये!

प्रेम झाल्या झाल्या पार्टनरकडून प्रेमाचे ते तीन शब्द ऎकण्यासाठी अनेकजण आतुर झालेले असता. हे तीन शब्द कोणत्याही कपलच्या जीवनात अतिशय महत्वाचे ठरतात. मात्र, प्रेमात असल्यावर केवळ आय लव्ह यू हे तीनच शब्द महत्वाचे नसतात. त्यासोबतच असे अनेक शब्द आहे जे त्याहूनही अधिक परिणामकारक आणि प्रभावी ठरतात. असेच काही शब्द आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..
१) मी आहे ना!
प्रेम दाखवणं आणि प्रेम निभावनं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. चांगल्या काळात एखाद्याची साथ मिळणं सोपं आहे मात्र, कठिण काळात जर तुम्ही पार्टनरला साथ दिली. तर ही बाब नात्यांसाठी अतिशय महत्वाची ठरते. यापेक्षा मोठा आनंद पार्टनरला दुसरा कोणताच होणार नाही.
२) सगळं काही ठिक होईल:
असे तर सगळेच म्हणत असतील. पण हे शब्द जर एखादा असा व्यक्ती उच्चारतो ज्याच्या शब्दावर तुम्हाला विश्वास आहे. तर ही बाब त्याहूनही जास्त महत्वाची ठरते. तुमचा सगळं काही ठिक होणार यावर पूर्ण विश्वास बसतो.
३) काही हरकत नाही:
अनेकदा नात्यामध्ये एखाद्याच्या तोंडून असं काही वाक्य निघतं ज्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. मात्र, काही वेळानंतर तसं काही बोलल्याचा तुम्हाला पश्चातापही होतो. अशात जर समोरच्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या चुकीबद्दल टोमणे मारण्याऎवजी तुम्हाला माफ करेल आणि म्हणेल की जाऊदे काही हरकत नाही….! तर यापेक्षा चांगली दुसरी गोष्ट नाही.
४) मला माफ कर:

https://www.askideas.com/media/08/My-Mistake-Am-Sorry.jpg

कुणाला माफ करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं. जर तुमच्या पार्टनरने मनापासून एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्याकडे माफी मागितली तर समोरच्या व्यक्तीबद्द्ल तुमच्या मनात आदर वाढतो. तुम्ही हे समजून जाता की, त्या व्यक्तीने मुद्दामहून तुमचं मन दुखवलं नव्हतं.
५) मला सगळं सांग:
http://dailysignal.com

तुम्ही खूप वेळ बोलत असाल. पण जेव्हा मनातलं सांगण्याची वेळ येते तेव्हा मात्र सर्वांनाच अडचण येते. त्यामुळे पार्टनरचं सगळं ऎकून घ्या. कदाचित त्यानेही पार्टनरला आनंद मिळेल.
६) ठिक आहे, मी करेल:
काही कामं असे असतात जे तुम्ही काही कारणास्तव करू शकत नाही. पण ते न झाल्याने तुम्हाला परेशानी होत असेल. अशात जर तुमचे पार्टनर ते काम करेल तर त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल.
७) पोहचल्यावर कॉल कर:
जर तुमचा पार्टनर तुम्हाला याची जाणिव करून देतो की, त्याला तुमची काळजी आहे. तर त्या पार्टनरच्या प्रेमाची जाणिव तुम्हाला सतत होत राहते. जर पार्टनर तुम्ही कुठे गेल्यावर पोहचल्यावर कॉल कर असे सांगत असेल तर यात त्याला/तिला काळजी आहे हे दिसून येतं.
८) तूला काय वाटतं:
एखाद्या गोष्टीवर आपलं घोडं हाकण्यापेक्षा पार्टनरचा जर विचार घेतला तर पार्टनरच्या मनात तुमच्याविषयी आदर वाढतो. यात अजिबातच कमीपणा नाहीये. भलेही पार्टनरने सांगितलेला विचार तुम्ही मान्य करा किंवा नका करू पण विचार जरूर घ्या.
९) तू खूप सुंदर आहे:
http://awallpapersimages.com

तुमच्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या पार्टनरला आवडतात. मात्र, तू खूप सुंदर आहे. हे वाक्य तुमच्या पार्टनरला जास्त आनंद देणारं ठरतं.