ऋतिक ची बहिण करणार आहे बॉलिवूडमध्ये एन्ट्री, शेअर केले नवे फोटो !

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आता अनेक नवनवीन कलाकार यांची एन्ट्री होऊ लागली आहे. अशातच लॉकडाऊन दरम्यान ऋतिक रोशनचा परिवाराकडून एक खूषखबर आली आहे. संपूर्ण रोशन परिवार हे फिल्म इंडस्ट्री आणि म्युझिक इंडस्ट्रीशी जोडले गेले आहे. ऋतिक रोशन नंतर आता त्याची चुलत बहीण सुद्धा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. याबाबतची पोस्ट स्वतः ऋतिक रोशनने शेअर केली आहे.

ऋतिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक मोठी पोस्ट शेअर करून लिहिले आहे की त्याला त्याच्या बहिणीवर गर्व आहे. ती आज तिच्या मेहनतीवर या स्थानावर पोहोचली आहे. ऋतिक ने एकापाठोपाठ एक त्याच्या बहिणीचे ८ फोटो शेअर केले. ऋतिकच्या चुलत बहिणीचे नाव पश्मिना आहे.
हे फोटो बघून तुम्हीसुद्धा नक्कीच बोलाल की पश्मिना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी पूर्णतः सज्ज आहे.फोटो बघताच क्षणी पश्मिना खूप ग्लॅमरस असल्याचे तुमच्या लक्षात येईल. चला आम्ही पण तुम्हाला दाखवतो की ऋतिकने पश्मिना चे असे कोणते फोटो शेअर केले आहेत ज्यात ती एवढे सुंदर दिसत आहेत.

ऋतिकने या पोस्ट सोबत मला तुझ्यावर खूप गर्व आहे पश्मिना. तू माझ्यासाठी खूप खास व्यक्ती असून तुझ्या मध्ये एक असाधारण प्रतिभा आहेत. तू तुझ्या व्यक्तिमत्त्वामुळे जेथे कुठे जातेस तेथे कोणतेही व्यवहार करून ती जागा रोशन करून टाकतेस असे लिहिले आहे.
सोबतच हृतिकने लिहिले की मला आश्चर्य वाटते तुझ्या मध्ये ही जादू आली कुठून? मात्र मी अधिक तर वेळेस देवाचे आभार मानतो की त्याने तुला आमच्या परिवाराचा हिस्सा बनवले. अशी मोठी पोस्ट लिहून ऋतिकने त्याची खुशी सगळ्यांसमोर जाहीर केली आहे.त्यांच्या परिवारातील अजून एक व्यक्ती हिंदी सिनेमासृष्टीत येत असल्याचा आम्हा सर्वांना आनंद होत असल्याचे त्याने सांगितले.

पश्मिना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे समजले पण पश्मिनाला याआधी रंगभूमीचा चांगला अनुभव आहे. तिने द जेफ गोल्डबर्ग द्वारा इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट च्या प्रोडक्शन मध्ये सुद्धा काम केले आहे.
पश्मिना चे वडील राजेश रोशन हे म्युझिक कंपोजर आहेत. वडिलांप्रमाणे तीसुद्धा नेहमीच कला या विषयाकडे आकर्षित झाली.
मेडिया रिपोर्टनुसार ऋतिक रोशन त्याच्या बहिणीच्या खूप जवळील व्यक्ती आहे. तिचे हे फोटो बघून तुम्हाला नक्कीच जाणवले असेल की ती किती सुंदर आहे. आता हे बघणे फारच उत्सुकतेचे ठरेल की ती तिच्या भावाप्रमाणे लोकप्रियता मिळू शकते की नाही.